Odisha News: गावातील लोक रोतोरात झाले लखपती, अचानक खात्यात जमा झाले लाखो रुपये
Money | Image Used For Representational Purpose Only (Photo Credits: pixabay)

ओडिशाच्या केंद्रपारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे अचानक लोक रातोरात लखपती झाले. एका मीडिया रिपोर्टनुसार, येथील लोकांच्या बँक खात्यात अचानक लाखो रुपये आले. गावात 40 बँक खाती होती ज्यात पैसे जमा झाले. मेसेज पाहताच खातेदार खूश झाले आणि पैसे काढण्यासाठी बँकेत पोहोचले आणि सर्व पैसे काढून घेतले. मात्र, काहींना रिकाम्या हाताने परतावे लागले.  जवळपास 40 बँक खात्यांवर मोठी रक्कम जमा करण्यात आली होती. ज्यावेळी बँकेत पैसे जमा झाल्याचा मेसेज खातेधारकांना मिळाला तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यानंतर लगेच सकाळी गावकऱ्यांनी बँकेत लांबलचक रांगा लावून पैसे काढण्यास सुरुवात केली. (हेही वाचा - Online Games Restriction Time: गेमिंग अ‍ॅक्टिव्हिटी वर वेळेचं बंधन घाला; नागपूर खंडपीठामध्ये याचिका)

बँक अधिकाऱ्यांनी पैसे काढणे बंद केले

लोकांना पैसे काढताना पाहून बँक अधिकाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पैसे काढणे बंद केले. लोकांच्या मोबाईलमध्ये पैसे जमा होत असल्याचा संदेश आला होता. काही लोकांच्या खात्यावर 2 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले, तर काही लोकांच्या खात्यावर केवळ काही हजार रुपये ट्रान्सफर झाले. बँकेतील गर्दी पाहून अधिकाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पैसे काढण्यास तात्पुरती बंदी घातली आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केली.

सुरुवातीला बँकेत पोहोचलेले लोक पैसे काढून निघून गेले. मात्र गर्दी वाढू लागल्याने अधिकाऱ्यांना संशय येऊ लागला. यानंतर खात्यात जमा झालेल्या रकमेबाबत अधिकाऱ्यांनाही संशय आला आणि त्यांनी तात्पुरते पैसे काढणे बंद करण्याचा निर्णय घेतला. लोकांच्या खात्यात पैसे कोठून आले याचा तपास अधिकारी करत आहेत.