अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहां हिच्या रिसेप्शन सोहळ्याचे खास फोटोज
Nusrat Jahan Wedding Reception (Photo Credits: Twitter)

बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan) गेल्या महिन्यात कोलकताचे व्यावसायिक निखिल जैन (Nikhil Jain) याच्यासोबत विवाहबद्ध झाली. टर्कीत झालेल्या या विवाहसोहळ्यात कुटुंबातील सदस्यांसह काही जवळचे मित्रमंडळी सहभागी झाले होते. काल नुसरत जहांच्या लग्नाचे ग्रँड रिसेप्शन कोलकता येथे पार पडले. या ग्रँड रिसेप्शनला सिनेसृष्टीतील दिग्गजांसह राजकारणी मंडळी देखील सहभागी झाले होते.

कोलकताच्या आयटीसी रॉयल हॉटेलमध्ये ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी देखील या रिसेप्शनला उपस्थिती लावली. त्याचबरोबर अभिनेत्री आणि खासदार मिमी चक्रवर्ती देखील रिसेप्शनला उपस्थित होती. याशिवाय देखील कार्यक्रमाचे अनेक फोटोज समोर आले आहेत.

नुसरत जहां हिने शोत्रु सिनेमातून सिनेसृष्टीत पर्दापण केले. त्यानंतर तिने खोका 420, खिलाडी, जमाई 420, लव एक्सप्रेस, क्रिसक्रॉस, नकाब, यांसारख्या बंगाली सिनेमात काम केले आहे. 2019 लोकसभा निवडणूकीत नुसरत हिने राजकारणात आपले नशीब आजमावले आणि त्यात यशस्वी होत लोकसभेची खासदार म्हणून निवडूनही आली.