Nushrratt Bharuccha (PC - Instagram)

बॉलिवुड अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) हिच्याशी संपर्क झाला आहे. इस्त्रायल-पॉलेस्टाईन युद्ध (Israel-Palestine War) संघर्षात ती अडकल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर भारतीय दूतावासाने (Indian Embassy) तातडीने उचललेल्या पावलानंतर तिच्याशी संपर्क झाला आहे. सध्या ती सुरक्षीत असून विमानतळावर दाखल झाली असल्याचे वृत्त आहे. आलिफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल 2023 निमित्ताने ती सध्या इस्त्राईल दौऱ्यावर होती. दरम्यान, हमास या दहशतवादी गटाने इस्त्राईलवर रॉकेट लॉन्चर्सद्वारे हल्ला केला आणि वातावरणच बदलून गेले.

वृत्तसंस्था एएनआयने नुसरत भरुचा हिच्या टीम सदस्या संचिता त्रिवेदी यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, अभिनेत्रीसोबत संपर्क करण्यात आम्ही यशस्वी झालो असून दूतावासाच्या मदतीने तिला सुरक्षितपणे घरी आणले जात आहे. ती सुरक्षित आहे आणि ती भारताकडे निघाली आहे.

इंग्रजी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नुसरत भरुचा हिचा तिच्या कुटुंबीयांशी संपर्क झाला आहे. तिने आपली आई तसन्नीम हिच्याशी संवाद साधला. मुलीशी संवाद झाल्यानंतर आपण आनंदी असल्याची भावना तिच्या आईने व्यक्त केली आहे. नुसरत हिच्याशी आपला संपर्क झाल्याचे सांगत इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, तिचा आणि भारती दूतावासाचा संपर्क झाला आहे. दूतावासाच्या मदतीने तिला सुरक्षीतपणे विमातळावर दाखल करण्यात आले. थेट विमान न मिळू शकल्याने कनेक्टींग फ्लाईटच्या माध्यमातून ती घरी येईल. सुरक्षेच्या कारणास्तव इतर तपशील सामाईक करण्यात आला नाही. मात्र, भारतात परतल्यानंतर अधिक माहिती दिली जाईल, असे तिने म्हटले आहे. दरम्यान, अभिनेत्री आणि तिच्या टीमशी शेवटचा संवाद झाला तेव्हा तिने म्हटले होते की, ती सुरक्षीत आहे. मात्र, आपल्या टीमसोबत ती तळघरात होती.

'X'पोस्ट

नुसरत भरुचा ही भारती अभिनेत्री आहे. सन 2002 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी तिने अभिनयास सुरुवात केली. अभिनेता प्रणय मेश्राम दिग्दर्शित थ्रिलर नाटक अकेलीमध्ये अलिकडील काळात ती अभिनय करताना दिसली होती. या चित्रपटात तिने एका सामान्य भारतीय मुलीची भूमिका साकारली होती.

दरम्यान, इस्त्राईल-पॅलेस्टाईन युद्ध वाढताना दिसत आहे. हमास या दहशतवादी गटाने पॅलेस्टाईनच्या बाजूने इस्त्राईलच्या प्रमुख शहरांना लक्ष केले. ज्यात तेल अवीववसह इतरही काही शहरांचा समावेश आहे. यात जळपास इस्त्राईलचे जवळपास 300 लोक मारले गेले. त्यानंतर इस्त्राईलनेही जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये पॅलेस्टाईनचे जवळपास 250 नागरिक मारले गेल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान नेत्यानावहू यांनीही पॅलेस्टाईनला गंभीर स्वरुपात इशारा दिला आहे.