उत्तर प्रदेशातील(Uttar Pradesh) नोएडा (Noida) येथे दुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांनी रस्त्यावरुन जाणाऱ्या मुलींचा विनयभंग (Molestation) केला आहे. दोन तरुणी रस्त्यावरुन चालत निघाल्या होत्या. दरम्यान, हे दुचाकीस्वार समोरुन आले आणि त्यांनी दुचाकी रस्त्यात उभी करुन मुलींना चुकीच्या पद्धतीने स्पर्ष केला. त्यानंतर मुलींनी आराओरडा केला मात्र दुचाकीस्वारांनी तेथून पळ काढला. सदर घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV Video) कैद झाली आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नोएडा येथील सेक्टर-68 मध्ये ही घटना घडली. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, तरुणांच्या बॅड टचमुळे तरुणी मोठ्या प्रमाणावर घाबरल्या आहेत. तरुणींच्या विरुद्ध दिशेने रस्त्यावरुन आलेले दुचाकीस्वार दुचाकी रस्त्यात थांबवून काही वेळ उभा राहिले. त्यांनी तरुणींना जवळ येईपर्यं वाट पाहीली. तरुणी जवळ येताच त्यांनी त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्ष केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही तरुणांचा शोध सुरू केला. (हेही वाचा, Uttar Pradesh: रामपूरमध्ये स्कूटरवर दोन मुलांनी एकमेकांना केले किस, व्हिडिओ व्हायरल)
विनयभंग म्हणजे एखाद्याला, सामान्यतः लहान मुलाला, व्यक्तीला चुकीच्या किंवा गैर-सहमतीने लैंगिक कृती, स्पर्श करणे. असे वर्तन करणे की जेणे करुन समोरच्या अथवा पीडित व्यक्तीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल. त्या व्यक्तीला अवघडल्यासारखे होईल. हा प्रकार शोषण करण्याच्या कृतीचा संदर्भ देते. यात कोणत्याही प्रकारचा लैंगिक छळ, गैरवर्तन किंवा हल्ल्याचा समावेश आहे. ज्यामध्ये अनुचित स्पर्श, अश्लील प्रदर्शन, लैंगिक बळजबरी किंवा व्यक्तीच्या संमतीशिवाय किंवा त्यांच्या इच्छेविरुद्ध केलेले इतर कोणतेही लैंगिक कृत्य समाविष्ट आहे.
व्हिडिओ
#NOIDA#महिला सुरक्षा को लेकर बड़ी खबर , नोएडा की सड़कों पर लड़कियों को सरे आम गलत जगह टच किया जा रहा है, नोएडा के सेक्टर 62 में सुबह 8:00 बजे दो लड़के राह चलती लड़की को गलत जगह टच करते हैं और बाइक से फिर निकल जाते हैं दोनों लड़कियां डरी सहमी हुई है*
PS 58 @noidapolice @Uppolice pic.twitter.com/BkYhu3k8F6
— PRIYA RANA (@priyarana3101) June 3, 2023
विनयभंग हा गंभीर गुन्हा आहे आणि व्यक्तीच्या सीमा आणि अधिकारांचे उल्लंघन आहे. यामुळे पीडित व्यक्तीला लक्षणीय शारीरिक, भावनिक आणि मानसिक हानी होऊ शकते, ज्यामुळे अनेकदा दीर्घकालीन आघात होतो. पीडितेची सुरक्षितता आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी आणि गुन्हेगाराला त्यांच्या कृत्यांसाठी जबाबदार धरण्यासाठी विनयभंगाच्या घटनांना संबोधित करणे आणि योग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार करणे महत्वाचे आहे. कायद्याने अशा प्रकारच्या कृत्यांना गंभीर शिक्षा आहे.