रेल्वे स्थानकातील खाद्यविक्रेत्यांनी बिल नाकारल्यास ग्राहकांना मिळणार फुकट जेवण, रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांची माहिती
No Food Bill No Payment Rule In Indian Railways (Photo Credits: Twitter)

अलीकडेच लोकसभेत (Loksabha)सादर झालेल्या अर्थसंकल्पात (Union Budget 2019)  रेल्वे प्रशासनात  सुधारणा आणण्यासाठी अनेक सुविधा घोषित करण्यात आल्या होत्या, यासोबतच रेल्वे प्रवाशांचा अनुभव अधिक सुधारण्यासाठी रेल्वे स्थानकांवरील ‘खाद्यान्न विक्रेत्यांनी ग्राहकाला बिल न दिल्यास जेवण फुकट’ असं नवं धोरण भारतीय रेल्वेने अवलंबलं आहे. याबाबत रेल्वे मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal)  यांच्या कार्यालयाच्या अकाउंटवरून ट्विट करत माहिती देण्यात आली आहे.Tejas Express: रेल्वेचे खासगिकरण? केंद्र सरकारचे मोठे पाऊल, 'तेजस एक्सप्रेस'च्या रुपात देशात धावणार पहिली Private Train: सूत्र

या सुविधेचा हेतू हा रेल्वेत पुरविली जाणारी जेवण व्यवस्था पारदर्शक व्हावी, असा आहे. ‘रेल्वे स्टेशन आणि रेल्वेमध्ये विक्रेत्याने खाद्यान्नाचं बिल देणे अनिवार्य आहे. जर विक्रेत्याने बिल देण्यास नकार दिला तर त्याला पैसे देण्याची आवश्कता नाही, अशावेळेस तुमचं खाणं मोफत असेल’. अशा आशयाचे हे ट्विट आहे.बिलाच्या सक्तीमुळे नफ्यासाठी मूळ किंमतीपेक्षा जास्त किंमत सांगून ग्राहकांना लुबाडण्याचे प्रकार थांबतील, असा विश्वास रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. त्याचसोबत प्रवाशांना गैरसोयीची तक्रार नोंदवण्यासाठी आणि मदतीसाठी एक हेल्पलाईन क्रमांक देखील दिला जाणार आहे.

पीयूष गोयल ट्विट

दरम्यान, हा निर्णय रेल्वे मंत्री गोयल यांनी मार्च 2019 मध्येच जाहीर केला होता, त्यानंतर आता पुन्हा एकदा अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नव्याने सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे हे सांगताना गोयल यांनी स्टेशन परिसरातील काही दुकानांच्या बाहेर लावलेले फलक दाखवणारे फोटो शेअर केले आहेत.