Tejas Express (Photo Credits: ANI)

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या भारतीय रेल्वे (Indian Railways) चे खासगिकरण करण्याचे धोरण प्रत्यक्षात आणायची तयारी केंद्र सरकारने बहुदा पूर्ण केली आहे. रेल्वे युनियनचा तीव्र विरोध असतानाही दिल्ली लखनऊ या रेल्वे मार्गावरुन तेजस एक्सप्रेस (Tejas Express) ही ट्रेन धावणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या ट्रेनचे वैशिष्ट्य असे की, Tejas Express ही देशातील पहिली खासगी ट्रेन असणार आहे. ही ट्रेन पूर्णपणे खासगी कंपनीकडून चालवली जाईल.

सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात नवभारत टाइम्सने म्हटले आहे की, रेल्वेने दिलेल्या संकेतानुसार रेल्वे आपल्या दोन रेल्वेगाड्यांची धुरा प्रायव्हेट सेक्टरच्या हातात पोहोचविण्याच्या 100 दिवसांच्या अजेंड्यावर विचार करत आहे. दरम्यान, रेल्वे युनियनने रेल्वेचे खासगिकरण करत खासगी यंत्रणांमार्फत रेल्वे संचलन करण्यास विरोध दर्शवला आहे. रेल्वे बोर्डाने एका दुसऱ्या मार्गाचीही तयारी केली आहे. हा मार्गही 500 किलोमीटर इतक्या अंतराच्या मर्यादेत असेल.

रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्ली-लखनऊ पहिला मार्ग आहे. ज्यावरुन चालणाऱ्या रेल्वें या खासगी ऑपरेटर्सकडून केले जाईल. अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, याबाबत एक महिन्यात निर्णय घेतला जाईल. IRCTC सुद्धा या मॉडेलवर सध्या काम करत आहे. दिल्ली-लखनऊ तेजस एक्सप्रेस या गाडीची घोषणा 2016 मध्येच झाली होती. मात्र, नुकत्याच जाहीर झालेल्या रेल्वेच्या नव्या वेळापत्रकात या गाडीचा समावेश केला आहे. (हेही वाचा, रेल्वे तिकीट घोटाळा: तत्काळ तिकिटांची अनधिकृत खरेदी-विक्री; तीन जणांच्या टोळीला अटक)

Tejas Express ही एक बहु-प्रतीक्षित ट्रेनपैकी एक आहे. जी सध्यास्थितीत उत्तर प्रदेश येथील आनंदनगर रेल्वे स्टेशन पार्किंगमध्ये आहे. ट्रेन संचालनसाठी बोली प्रक्रिया सुरु झाल्यानंतर ही ट्रेन खासगी कंपनीकडे सोपविण्यात येईल. आयआरएफसीच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात एनबीटीने म्हटले आहे की, ट्रेनच्या कस्टडीविरोधात इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिजम कॉर्पोरेशन (IRCTC) कडे ट्रान्फर केली जाईल. याच्या लीज चार्जपासून इतर शुल्काचा भरणा फायनान्स विभाग करणार आहे.