Passengers can Take Photos, Videos in Flights: विमान प्रवासादरम्यान सेल्फी आणि व्हिडिओग्राफी वर बंदी नाही; DGCA चे स्पष्टीकरण
Flight (Photo Credits: Pixabay)

विमानात फोटो, सेल्फी किंवा व्हिडिओ काढण्यासाठी बंदी नसल्याचे नागरी उड्डाण संचालनालयाने आज (रविवार, 13 सप्टेंबर) स्पष्ट केले आहे. काल (12 सप्टेंबर)  DGCA (Directorate General of Civil Aviation) विमानात फोटो, व्हिडिओ काढणाऱ्या प्रवाशावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार, विमानप्रवास दरम्यान फोटोज, सेल्फी काढणाऱ्या प्रवाशाला दोन आठवड्यांसाठी त्या मार्गावरुन प्रवास करण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. यावर आता DGCA कडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. (Violations of Flight Norms: विमान प्रवासादरम्यान फोटोग्राफी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशाला 2 आठवड्यांपर्यंत प्रवासाची परवानगी नाही: DGCA)

प्रवासी विमानात, विमान टेक-ऑफ किंवा लँड होत असताना still and video photography करु शकतात. परंतु, विमानाच्या सुरक्षेला धोका पोहचेल अशा कोणत्याही प्रकारची साधनं वापरण्यास मनाई आहे. त्याचप्रमाणे व्हिडिओग्राफी करताना विमान प्रवासात अडथळा येऊ नये किंवा कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल., असे DGCA  कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ANI Tweet:

विमानाच्या आतून फोटो काढताना आढळल्यास त्या एअरलाईन्सची ती फ्लाईट दोन आठवड्यांसाठी निलंबित केली जावू शकते, असे शनिवारी DGCA  ने दिलेल्या आदेशात म्हटले होते. फोटोग्राफी नियामांचे उल्लंघन करताना आढळल्यास प्रवासाच्या पुढच्या दिवसापासून एअरलाईन्स वर दोन आठवड्यांचा निर्बंध लागू होईल. दरम्यान विमानात पहिल्यापासूनच फोटोग्राफी निलंबित केली आहे. मात्र अनेक कंपन्या हा नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी असमर्थ ठरल्या असल्याचे Aviation Regulator ने म्हटले होते.

फोटो, व्हिडिओ काढल्यामुळे वैमानिक आणि क्रु मेंबर्सचे लक्ष विचलित होऊन सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे प्रवासादरम्यान फोटोग्राफीला आळा घालण्यात आला होता. अभिनेत्री कंगना रनौत 9 सप्टेंबर रोजी मुंबईत परतत असताना विमान प्रवासादरम्यान झालेल्या फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीच्या गोंधळानंतर DGCA ने हा आदेश काढला होता.