Nirmala Sitharaman (Photo Credit - PTI)

सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफ (PPF) सह पोस्ट खात्यातील बचत योजनांवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय काल रात्री अचानक जाहीर झाल्यानंतर त्याच्या सर्वच स्तरांमधून टीका होत होती. आज 1 एप्रिल नवे आर्थिक वर्ष सुरू झाल्याने अनेकांना या वर्षाकडून अपेक्षा आहेत. मात्र सर्वसामान्यांना व्याजदर कमी करण्याचा निर्णय ऐकून झटका बसला होता पण अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी हा व्याजदर कपातीचा निर्णय मागे घेतला आहे. हा आदेश नजर चूकीने जाहीर झाल्याचं स्पष्टीकरण त्यांनी ट्वीट करून दिले आहे.

दरम्यान सीतारमण यांच्या ट्वीटनुसार केंद्र सरकारच्या सार्‍या लहान बचत योजणांवरील व्याजदर हा 2020-21 च्या शेवटच्या तिमाहीप्रमाणेच राहणार आहे. त्यामुळे आता हा अनेक ठेवींदारांसाठी मोठा दिलासा आहे. कोरोना संकटामुळे सार्‍यांचंच आर्थिक गणित कोलमडून पडलं आहे. यामध्ये आता बचत योजनांवरील व्याजदरही कमी केलेत तर अनेकांसाठी महिन्याचा गाडा हाकणं देखील कठीण होण्याची चिन्हं आहेत. PF सह लघू बचत योजनेवरील व्याजदरात कपात; 1 एप्रिलपासून नवे दर लागू.

Tweet

काल जाहीर केल्यानुसार, पीपीएफवर मिळाणारा 7.1 टक्के व्याजदर 6.4 टक्के होईल, नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेटवर मिळणारा 6.8 टक्के व्याजदर 5.9 टक्के होईल तर सुकन्या समृद्धी योजनेवर मिळाणारा 7.6 टक्के व्याजदर आता 6.9 टक्के होईल. यासोबतच पोस्ट ऑफिस सेव्हिंगवरील व्याजदर देखील कमी करणार असल्याची माहिती देण्यात आली होती पण आता हे सारे व्याज दर पूर्वीप्रमाणेच ठेवले जातील.