निर्भया सामूहिक बलात्कार दोषींना फाशी देण्यासाठी खानदानी जल्लादला मिळणार इतकी मोठी रक्कम; रोज 2 तास होणार तालीम
Nirbhaya Case Convicts (Photo Credits: File Image)

निर्भया सामूहिक बलात्कार (Nirbhaya Gangrape) प्रकरणातील दोषींना फाशी देण्याचा बहुप्रतीक्षित दिवस जसा जवळ येताना देशभरात आनंद आणि औत्सुक्य वाढत चाललं आहे, यात सर्वात जास्त उत्सुक असा एक व्यक्ती म्हणजे ही फाशी ज्याच्या हातून घडणार आहे तो जल्लाद. प्राप्त माहितीनुसार, निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व दोषींना फाशी देण्यासाठी एका खानदानी जल्लादाची निवड करण्यात आली आहे. या जल्लादचे नाव पवन (Pawan Jallad) असे असून त्याला या कामासाठी एक लाख रुपयांची मोठी रक्कम मिळणार आहे.याच कामासाठी काही दिवसांत त्याची रोज 2 तास अशी तालीमही करून घेतली जाणार आहे. फाशी देणाऱ्या जल्लाद याला किती पैसे दिले जातात?

पवनने अलीकडेच याबाबत माध्यमांशी संवाद साधला. "आपल्याला या कामासाठी निवडल्याचा प्रचंड आनंद होत आहे, मागील काही काळापासून माझी आर्थिक स्थिती बरीच खालावली होती त्यातच माझ्या मुलीचे लग्न देखील आहे, आता या केसमध्ये फाशी देण्याचे काम केल्यावर मिळणाऱ्या पैशातून मुलीचे लग्न लावून देणार आहे" हे सांगताना पवन याने देवाचे आभार सुद्धा मानले. Nirbhaya Case: आरोपींच्या विरोधात डेथ वॉरंट जारी, 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता होणार फाशी

पवनला आपल्या जल्लादच्या कामाविषयी विचारणा केली असता त्याने अनेक मोठे खुलासे केले. ही नोकरी करताना दर महिन्याला केवळ 5000 रुपये इतका पगार दिला जातो. जेव्हा प्रत्यक्ष फाशी द्यायची असते तेव्हाच प्रति व्यक्ती 25 हजार रुपये इतकी कमाई होते. त्यामुळे खरंतर आमचं आयुष्य फाशीवरच चाललंय असं म्हणायला हवं असे पवन म्हणाला. निर्भया प्रकरणात 4 दोषी आहेत त्यामुळे पहिल्यांदाच इतकी मोठी रक्क्म मिळत असल्याचा आनंद देखील त्याने व्यक्त केला. आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे अनेकदा लोकांना जल्लाद दारू पिऊन मग फाशी देत असल्याची खोटी माहिती असते, असं काहीही होत नसून आम्हाला या कामासाठी ट्रेनिंग दिले जाते असाही खुलासा पवनने केला.

दरम्यान, पवन हा एक खानदानी जल्लाद आहे. त्याच्या कुटुंबातील पिढ्यांनी जल्लाद म्ह्णून काम केले आहे, विशेष म्हणजे दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांना फाशी देणारे पवनचे आजोबा होते.