फाशी देणाऱ्या जल्लाद याला किती पैसे दिले जातात?
Death penalty. (Photo Credits: Pixabay, Open Clip Art)

निर्भया प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. तर आरोपीवर दया करण्याबाबत याचिका राष्ट्रपतींकडे देण्यात आली आहे. मात्र तरीही आरोपींना कडक शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे. या आरोपींना शिक्षा देण्यासाठी एक स्पेशल रस्सी सुद्धा बनवली जात असून जल्लादाचा शोध घेतला जात आहे.

फाशी देण्याची वेळ काय असते, त्याची प्रक्रिया काय, फाशी देण्यावर जल्लाद याला किती पैसे दिले जातात असे विविध प्रश्न सर्वांनाच पडलेले असतात. या प्रश्नांची उत्तर आज तर यांच्या क्राइम तक टीम यांनी पवन नावाच्या एका जल्लाद याच्यासोबत बातचीत केली. तर पवन यांनी असे म्हटले की त्यांच्या संपूर्ण परिवारातील व्यक्तींनी आतापर्यंत जल्लदाचे काम केले आहे. यापुढे त्यांनी असे ही विचारले की, फाशी देण्याच्या कामात तुम्हाला किती पैसे दिले जातात त्यावेळी त्यांनी असे म्हटले की, यापूर्वी जुन्या जमान्यात त्यांना वेळेपेक्षा अधिक पेसै देण्यात येत होते. त्यावेळी 100 रुपये देण्यात होते आणि जुन्यावेळी ही रक्कम फार मोठी होती. 2013 पर्यंत ही वाढून 3 हजार रुपये झाली होी. मात्र ही रक्कम सध्याच्या तुलनेत फार कमी आहे. जल्लाद यांना देण्यात येणाऱ्या पैशांच्या विरोधात आवाज उठावण्यात आला. तेव्हापासून आता 5 हजार रुपये जल्लाद यांना दिले जातात. तर पवन यांच्या परिवारातील आतापर्यंत 25 जणांनी जल्लाद रुपात फाशीची शिक्षा आरोपींना दिली आहे.

त्याचसोबत फाशीची शिक्षा देताना सफेद रुमाल का वापरला जातो असा सुद्धा प्रश्न पवन यांना विचारला गेला. यावर त्यांनी असे म्हटले आहे की, फाशीची शिक्षा देताना तेथे उपस्थितीत असलेला एकही व्यक्ती बोलत नाही. फक्त इशाऱ्यांच्या माध्यमातून काम केले जाते. त्याचसोबत फाशीची दोरी खेचण्यासाठी रुमालाचा वापर केला जातो. पण फाशी देताना रुमाल खाली पाडला जात नाही तर एका विशिष्ट अंदाजात झटकला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.(Nirbhaya Gangrape Case: दोषींना फाशीची मागणी करणारी याचिका पटियाला हाऊस कोर्टात टळली; सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर होणार फैसला) 

निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी जल्लादची शोध घेतला जात आहे. त्यासाठी उत्तर प्रदेशातील जेल प्रशासनांना चिठ्ठी लिहिण्यात आली आहे. 9 डिसेंबरला तिहार जेल प्रशासनाच्या वतीने चिठ्ठी लिहिण्यात आली होती. युपी येथे जल्लाद यांची संख्या आहे. त्यामुळे जर या ठिकाणाहून जल्लाद आल्यास तिहार जेल प्रशासनाकडून जल्लादाचा सर्व खर्च केला जाणार आहे.