Nirbhaya Gangrape Case: दोषींना फाशीची मागणी करणारी याचिका पटियाला हाऊस कोर्टात टळली; सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर होणार फैसला
प्रतीकात्मक तस्वीर (Photo Credits: IANS)

हैदराबादमध्ये डॉक्टर तरूणीवर बलात्कार करून हत्या करणार्‍या चार आरोपींचा पोलिसांनी खात्मा केल्यानंतर दिल्लीतील निर्भया बलात्कात प्रकरणी आरोपींनाही फाशीची शिक्षा देण्याची मागणी आता जोर धरत आहे. दरम्यान आज दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टमध्ये निर्भया गॅंगरेप प्रकरणातील आरोपींची सुनावणी टळली आहे. फाशीची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी आता याचिकेवर चारही दोषींना आणि त्यांच्या वकिलांना नोटीस देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत सध्या 18 डिसेंबरपर्यंत या सुनावणीला स्थगिती देण्यात आली आहे.  पटियाला हाऊस कोर्टने निर्भयाच्या आईकडून करण्यात आलेल्या फाशीच्या मागणीला फेटाळले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना व्हिडिओ कॉन्फरंस द्वारा पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. सध्या त्यांच्या जीवाला धोका अस्सल्याने सुनावणी व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारा घेतली जाणार आहे.

ANI Tweet

16 डिसेंबर 2012 साली 23 वर्षीय तरूणीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर उपचारादरम्यान तरूणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान एकाने तिहार जेलमध्ये आत्महत्या करून आपले जीवन संपवले.