निर्भया बलात्कार दोषी पवन कुमार गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फाशी अटळ!
The Supreme Court of India | File Image | (Photo Credits: PTI)

निर्भया सामूहिक बलात्कार (Nirbhaya Gang Rape) प्रकरणातील दोषी पवन कुमार गुप्ता (Pawan Kumar Gupta)  याने गुन्हा घडतेवेळी आपण अल्पवयीन असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)  दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. पवनचे वकील ए पी सिंह (A. P. Singh)  यांनी कोर्टात त्याची बाजू मांडताना ज्यावेळी, 2012 मध्ये हा सामूहिक बलात्कार घडला, तेव्हा पवनचे वय 17 वर्ष आणि 1 महिना इतके होते, ज्याचा अर्थ की तो अल्पवयीन होता, मात्र दिल्ली पोलिसांनी त्याचे जन्मदाखले आणि ओळखपत्रे मुद्दाम लपवली.

नियमानुसार त्याला फाशी सुनावणे गैर आहे असा युक्तिवाद वकिलांनी केला होता. याचिकेवर सुप्रीम कोर्टाने सुनावणी घेत या याचिकेला काहीही अर्थ नसल्याचं म्हणत ही याचिका फेटाळली आहे.न्या. भानुमति यांच्या नेतृत्वाखाली तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने पवनच्या याचिकेवर सुनावणी करताना निर्णय दुपारी अडीच वाजेपर्यंत राखून ठेवला होता. आजच्या दिवसाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी क्लिक करा

यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने 19 डिसेंबर 2019 च्या सुनावणीत पवन याचा अल्पवयीन असल्याचा युक्तीवाद फेटाळून लावत वकिलांना 25 हजार रुपयांचा दंडही लावला होता. मात्र तरीही त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत पुन्हा याचिका केली होती.

ANI ट्विट

दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी चार दोषींना 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येईल असा आदेश नव्याने जारी केला आहे. याआधी त्यांना 22 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता फाशी देण्यात येईल असे आदेश जारी करण्यात आले होते. मात्र दोषी मुकेश सिंह याने त्याच काळात राष्ट्रपतींकडे द्या याचिका केल्याने ही तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे.