अजय देवगणचा बहुप्रतीक्षित चित्रपट तान्हाजी10 जानेवारीला प्रदर्शित झाला. सध्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर उत्तम घोडदौड चालू आहे. 10 दिवसांत या चित्रपटाने 160 कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. आता उद्या संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजय देवगणसोबत हा चित्रपट पाहणार आहेत. प्लाझा चित्रपटगृहात संध्याकाळी 6 वाजता मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवकांसाठी तान्हाजीचा स्पेशल शो दाखवला जाणार आहे. 

डीएसके यांच्या संपत्तीचा लवकरच लिलाव होणार आहे. सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि राज्य शासनाने जप्त केलेल्या डीएसके यांच्या संपत्तीच्या लिलावासाठी नोटीस काढावी असा आदेश सोमवारी विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी दिला आहे. आतापर्यंत डीएसके यांच्या 463 स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या मालमत्ता विकून ठेवीदारांना ते पैसे देण्यात येणार आहेत.

महाविकास आघाडीचा शपथविधी पार पडला मात्र त्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना वगळण्यात आले होते. त्यानंतर कॉंग्रेसकडून त्यांना कोणते पद देण्यात येते याकडे लक्ष लागले होते. आता नुकतेच मध्य प्रदेश जाहीरनामा अंमलबजावणी समितीच्या अध्यक्षपदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची निवड केली आहे. कॉंग्रेसने छत्तिसगढ, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब व पुदुच्चेरीसाठी अंमलबजावणी समितीची निवड केली आहे.

 महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेबाबत केलेल्या धक्कादायक विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र त्यांच्या या विधानावरुन 'शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला' अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच याबाबत शिवसेनेला स्पष्टीकरणही द्यावे लागेल असेही त्यांनी म्हटले आहे.  

मनसे पक्षाच्या नव्या झेंडा कसा असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. मात्र राज ठाकरे यांनी महामेळाव्या करिता लावलेली पोस्टर्स मनसेच्या नव्या झेंड्याचे संकेत दिले आहेत. इतकच नव्हे तर मनसेच्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटर पेजवरही मनसेचा झेंडा गायब झाला आहे. केवळ इंजिनाचा फोटो दिसत आहे.  

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला शिर्डी साईबाबा जन्मस्थळाचा वाद अखेर संपला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह झालेल्या बैठकीत यावर सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती शिर्डी साईबाबा संस्थानचे प्रतिनिधी कमलाकर कोथे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून त्यांच्या निर्णयावर आम्ही शिर्डीकर समाधानी आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिर्डीकरांची चर्चा सकारात्मक झाली आहे. आता शिर्डीकरांची चर्चा सकारात्मक झाली आहे. 

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी पवन कुमार गुप्ता याने सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. गुन्हा घडतेवेळी आपण अल्पवयीन होतो मात्र दिल्ली उच्च न्यायालायने निर्णय देताना ही बाब लक्षात घेतली नाही असे म्हणत पवनने याचिका दाखल केली होती.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी जेपी नड्डा यांची निवड झाली आहे. ही निवड बिनविरोध झाली असून निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांनी ही घोषणा केली आहे.

आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तत्पूर्वी त्यांनी रोड शो च्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते.

Load More

40 भाजप  राष्ट्रीय अध्यक्षपदी (BJP National President) आज नवा चेहरा विराजमान होणार आहे, या शर्यतीत भाजपचे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा (J.P. Nadda) यांचे नाव चर्चेत आहे. सकाळी 10.30 ला भाजपाच्या मुख्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. विशेष म्हणजे या पदासाठी त्यांची बिनविरोध निवड होणार असल्याचं वृत्त असून, त्यामुळे आजच या नावाची घोषणा होउ शकते.आतापर्यंत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष ही जबाबदारी अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे होती. केंद्रीय गृहमंत्रीपदाची जबाबदारी आल्यानंतर अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांना यासंदर्भात जूनमध्येच पत्र लिहित पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीकडे देण्यात यावी, अशी विनंती केली होती. त्यानंतर अनेक ठिकाणच्या विधानसभा निवडणुका असल्याने भाजपने ही राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक पुढे ढकलली होती. आता दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या आधी आज एका नव्या चेहऱ्याला भाजप अध्यक्षपदी निवडले जाणार आहे.

दुसरीकडे, मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात शिर्डी मध्ये तापलेला साईबाबा जन्मस्थळाचा वाद देखील आज मिटेल अशी शक्यता आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांना विनंती केल्यावर आज शिर्डी मधील बंद मागे घेण्यात आला आहे. मात्र मूळ वादाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी आज उद्धव ठाकरे हे ग्रामस्थांसोबत बैठक घेणार आहेत.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या कामामध्ये देखील अनेक महत्वपूर्ण खटल्यांची सुनावणी होणार आहे. यामध्ये, निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी पवन कुमार गुप्ता याच्या याचिकेवर कोर्ट काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. २०१२ साली बलात्कार घडताना आपण अल्पवयीन असल्याने आपल्याला या गुन्ह्यातून माफ केले जावे अशी पवनची याचिका आहे. यासोबतच रॉबर्ट वड्रा आणि मनोज अरोरा यांना मनी लॉन्डरिंग प्रकरणात देण्यात आलेली जामीन रद्द करण्याच्या ईडीच्या मागणीवर देखील आज सुनावणी होणार आहे.