Nirbhaya Gangrape Case: निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींविरोधात नवे डेथ वॉरंट जारी; 20 मार्च रोजी होणार फाशी
Nirbhaya gangrape and Murder case four convicts (Photo Credits: IANS)

Nirbhaya Gangrape Case: निर्भया गँगरेप प्रकरणातील दोषींना 3 मार्च रोजी होणारी फाशी टळल्यानंतर दिल्ली कोर्टाने आज चारही दोषींविरोधात नवे डेथ वॉरंट (Fresh Death Warrant) जारी केले आहे. या नव्या डेथ वॉरंटनुसार 20 मार्च रोजी पहाटे 5:30 वाजता दोषींना फाशी देण्यात येईल. यापूर्वी तीनदा दोषींची फाशी लांबणीवर पडली होती. मात्र यावेळी दोषींची फाशी अटळ असल्याचे बोलले जात आहे.

यापूर्वी फाशीसाठी 3 मार्च ही तारीख ठरली होती. पण दोषी पवनकुमार गुप्ता याने क्युरेटिव्ह याचिका दाखल केल्याने सुनावणी सुरू झाली आणि फाशी रद्द करण्यात आली. मात्र Curative Plea सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. तसंच राष्ट्रपतींनीही दया याचिका फेटाळून लावली. त्यामुळे आता फाशीची शिक्षा अटळ असल्याचे सांगितले जात आहे. (निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी पवन याची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली)

ANI Tweet:

पहिल्या वेळी 22 जानेवारी तर दुसऱ्या वेळी 1 फेब्रुवारी ही फाशी देण्याची तारीख ठरली होती. त्यानंतर 3 मार्च ला फाशी होणार होती. मात्र सातत्याने फाशीसाठी दिरंगाई होत होती. या सर्व प्रकरणावर निर्भयाची आई आशादेवी यांनी आज तरी नवे डेथ वॉरंट जारी होईल, अशी आशा व्यक्त केली होती.

काय आहे निर्भया गँगरेप प्रकरण?

दिल्ली येथे 16 डिसेंबर 2012 च्या रात्री 23 वर्षीय तरुणी निर्भया हिच्यावर गँगरेप करण्यात आला. त्यानंतर तिला रस्त्यावर फेकून देण्यात आले. निर्भया पॅरामेडिकलची विद्यार्थीनी होती. गँगरेप नंतर तिच्यावर दिल्लीत उपचार सुरु होते. त्यानंतर तिला उपचारासाठी एअरलिफ्टने सिंगापूरला नेण्यात आले होते. मात्र 13 दिवस तिची मृत्यूशी झुंज चालू होती. अखेर 29 डिसेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी 31 ऑगस्ट 2013 रोजी 6 आरोपी कोर्टात दोषी ठरले.

या 6 पैकी एक अल्पवयीन असल्याने त्याला बाल सुधारगृहात पाठण्यात आले. तर एका दोषीला तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली. इतर चार दोषी- पवन, मुकेश, अक्षय आणि विनय यांच्या विरोधात चौथ्यांदा डेथ वारंट जारी झाले आहे.