Nirbhaya Case: सोनिया गांधी यांचे उदाहरण घेऊन गुन्हेगारांना माफ करा; निर्भयाची आई आशा देवी यांना दोषींच्या वकिल इंदिरा जयसिंह यांचा अजब सल्ला
Indira Jaising And Asha Singh (Photo Credits: Facebook, Twitter)

निर्भया खटल्यात (Nirbhaya Gangrape Case)  दोषींना सुनावण्यात आलेली शिक्षा कायम ठेवून आता केवळ 22 जानेवारी ऐवजी 1 फेब्रुवारी रोजी फाशी देण्याचा निर्णय काल दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) दिला आहे. यामुळे अगोदरच नाराज असणाऱ्या निर्भयाच्या आई आशा सिंह (Asha Singh) यांना आता दोषींच्या वकील इंदिरा जयसिंह (Indira Jaising) यांनी एक विचित्र सल्ला दिला आहे. इंदिरा यांनी काल न्यायलयाच्या निर्णयांनंतर लगेचच ट्विट करत "आशा सिंह यांनी सोनिया गांधी (Sonia Gandhi)  यांचे उदाहरण घेत निर्भयाच्या दोषींची फाशी थांबवावी" असा सल्ला दिला आहे. या अजब सल्ल्याने संतप्त आशा यांनी सुद्धा इंदिरा यांच्यावर शाब्दिक हल्ला करत, मला असा सल्ला देण्याऱ्या तुम्ही आहात कोण? असा सवाल केला आहे. तसेच यांच्यासारख्या लोकांमुळेच देशात बलात्कार पीडितांना न्याय मिळत नाहीये असेही आशा यांनी म्हंटले आहे.

इंदिरा यांच्या ट्विट मध्ये, "आपण, आशा देवींचे दु:ख आणि वेदना मी समजू शकतो.पण तरीही मी त्यांना सोनिया गांधी यांचं अनुकरण करायला सांगेन. सोनियांनी ज्याप्रमाणं त्यांचे पती राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील दोषी नलिनी हिला माफ केलं आणि आपण मृत्युदंडाच्या शिक्षेविरोधात असल्याचं सांगितलं होतं, हाच आदर्श आशा यांनी सुद्धा घ्यावा, आम्ही आशा देवी यांच्या सोबत आहोत, मात्र मृत्युदंडाच्या विरोधात आहोत" असे म्हंटलेले आहे.

इंदिरा जयसिंह ट्विट

तर, दुसरीकडे आशा सिंह यांनी या ट्विटनंतर प्रतिक्रिया देताना इंदिरा यांच्याप्रती नाराजी आणि राग व्यक्त केला. आपण या खटल्याच्या निमित्ताने अनेकदा इंदिरा यांना भेटलो आहोत मात्र त्यांना कधीच आमची चौकशी करावीशी वाटली नाही, पण आता दोषींच्या बाजूने त्या असा वायफळ सल्ला देत आहेत, संपूर्ण देह निर्भयाच्या बलात्कार दोषींच्या फाशीची वाट पाहत असताना अशा लोकांमुळेच न्याय मिळण्यास उशीर होत आहे असेही आशा सिंह यांनी म्हंटले आहे.

ANI ट्विट

दरम्यान, निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात कोर्टाने निर्णय दिल्यावर दोषी मुकेश सिंह याने दयेची याचिका दाखल केली होती. काल गृहमंत्रालयाकडून हा अर्ज राष्ट्रप्टी रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवण्यात आला होता,मात्र ही याचिका राष्ट्रपातींनी फेटाळून फाशीचा मार्ग मोकळा केला आहे. येत्या १ फेब्रुवारी रोजी तिहार जेल येथे या चारही दोषींना फासावर लटकवण्यात येणार आहे.