Nirbhaya Case Convicts Hanged: निर्भया च्या फोटोला मिठी मारून रडल्या आशा देवी; आरोपींच्या फाशीनंतर दिल्लीवासियांनी तिहार जेल बाहेर केले 'असे'  सेलिब्रेशन
Nirbhaya's mother Asha Devi. (Photo Credits: ANI)

निर्भया बलात्कार प्रकरणातील (Nirbhaya Gangrape & Murder Case)  चारही दोषींना आज, 20 मार्च रोजी सकाळी 5,30 वाजता तिहार जेल (Tihar Jail) मध्ये फासावर लटकवण्यात आले. दरम्यान तब्बल 7  वर्ष आपल्या लेकीसाठी लढणाऱ्या निर्भयाच्या आई आशा देवी (Asha Devi) यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. माध्यमांशी संपर्क साधताना निर्भयाच्या आईने Victory Pose देऊन आपल्या लेकीला न्याय मिळाल्याचे सेलिब्रेशन केले. सोबतच या निर्भया प्रकरणातील वकील सीमा कुशवाह (Seema Kushwaha), माध्यमे आणि न्यायालयाचे सुद्धा आभार आशा देवी यांनी मानले. "काल जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने दोषी अक्षय ठाकूर याची याचिका फेटाळून लावली आणि फाशी होणार याची खात्री झाली तेव्हा सर्वात आधी घरी जाऊन निर्भयाच्या फोटोला मी मिठी मारली आणि तिला न्याय मिळाला हे सांगितले" अशी प्रतिक्रिया आशा देवी यांनी साश्रू डोळ्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली. तर दुसरीकडे, तिहार जेलच्या बाहेर दिल्ली वासियांनी सुद्धा लाडु पेढे वाटत सकाळी 5.30 वाजता जोरदार सेलिब्रेशन केले.

निर्भयाला न्याय मिळाला! दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणातील चार ही दोषींना तिहार जेल मध्ये फाशी

दरम्यान, आपल्याला जरी न्याय मिळाला असला तरी ज्या पद्धतीने हा खटला इतके वर्ष लांबणीवर पडत गेला ते नक्कीच कौतुकास्पद नाही, आमचा लढा देशातील अन्य मुलींसाठी सुद्धा आहे. मी माझ्या मुलीला वाचवु शकले नाही मात्र यापुढे कोणत्याही मुलीला असा लढा द्यावा लागणार नाही यासाठी मी काम करेन असेही आशा देवी यांनी म्हंटले आहे.

ANI ट्विट

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी अक्षय ठाकूर, विनय शर्मा, पवन कुमार गुप्ता, मुकेश सिंह यांनी मागील दोन महिन्यातच तब्बल तीन वेळा कायदेशीर मार्गाने पळवाटा शोधात फाशी पुढे ढकलली होती. कित्येकदा यावरून निर्भयाच्या आईने न्यायालयासमोर नाराजी व्यक्त केली होती, यावर उलट दोषीच्या वकिलांनी आशा देवी यांनीच मोठेपणा दाखवून या चौघांची फाशी रद्द करायला सांगावी असा सल्ला दिला होता. मात्र आज मागील 7 वर्ष 3 महिने आणि 3 दिवसापासून सुरु असणारा हा लढा यशस्वी झाला, ज्याचा आनंद नागरिकांनी घोषणाबाजी करत मिठाई वाटत आनंद व्यक्त केला