Money. Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

मोदी सरकार कडून महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने एक योजना सुरू करण्यात आली आहे.समाजातील मागासवर्गीय महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी 'राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ' त्यांना मुदत कर्ज देऊन लाभ दिला जात आहे. या कर्जाचा वापर करून महिला स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतात किंवा सध्याच्या व्यवसायाचा विस्तारही करू शकतात. मोदी सरकारची ही योजना New Swarnima Loan Scheme आहे.

न्‍यू स्वर्णिमा लोन योजना काय आहे?

न्‍यू स्वर्णिमा लोन योजना ही मुदत कर्ज योजना आहे. ज्याची सुरुवात राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाने केली होती. मागासवर्गीय महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजने अंतर्गत ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार योजनांचा लाभ देते. त्यांना जास्तीत जास्त दोन लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. या कर्जावर सरकार दरवर्षी ५ टक्के व्याज आकारत आहे, जे सामान्य व्याजदरापेक्षा खूपच कमी आहे.जे प्रति महिना अंदाजे 42 पैसे असेल. यामध्ये घेतलेल्या कर्जावर दर तीन महिन्यांनी ईएमआय भरावा लागतो.

स्वर्णिमा कर्ज योजनेंतर्गत कर्ज कोणत्या कारणांसाठी घेतले जाऊ शकते?

आरोग्य सेवा,व्यवसाय वाढवणे,एक लहान व्यवसाय सुरू करणे, शिक्षण. स्वर्णिमा कर्ज योजनेचा लाभ गृहनिर्माण इत्यादींसाठी घेता येतो.

स्वर्णिमा कर्ज योजनेसाठी अर्ज कसा कराल?

स्वर्णिमा कर्ज योजनेसाठी अधिकृत वेबसाइट http://www.nbcfdc.gov.in/ वर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येईल. याशिवाय NBCFDC कार्यालयात जाऊनही अर्ज करता येईल.