PF withdrawal from ATMs: नोकरदारांच्या पगारामध्ये पीएफ हा एक महत्त्वाचा घटक असतो. कर्मचारी आणि कंपनी 12%-12% रक्कम जमा करत असते. निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी सोय म्हणून या रक्कमेकडे पाहिलं जात असल्याने पीएफ बद्दल आता नोकरदार अधिक सजग झाले आहेत. पीएफ अकाऊंटमधून काही विशिष्ट कारणांसाठीच पैसे काढण्याची मुभा त्यांना असते. पण त्यासाठी खूप मोठी प्रक्रिया करावी लागत आहे.नोकरदारांसाठी ही प्रक्रिया सुकर सुलभ करण्याच्या उद्देशाने आता पीएफ मध्ये पैसे नोकरदार एटीम मधून थेट काढू शकतील अशी सोय करण्याचा विचार सुरू आहे.
Labour Secretary Sumita Dawra यांनी दिलेल्या माहितीनुसार, Labour and Employment Ministry कडून आयटी सिस्टीम्स अपडेट केली जात आहे. यामध्ये पीएफ काढण्याची प्रक्रिया सह अन्य सुविधादेखील सुलभ करण्याचा विचार सुरू आहे. 2025 मध्ये IT 2.1 upgrade लाईव्ह झाल्यानंतर EPFO चे आयटी इंफ्रास्ट्रकचर banking systems प्रमाणे होणार आहे. परिणामी कमीत कमी मानवी हस्तक्षेप करत पीएफ फंड काढणं सोप्प होणार आहे. नक्की वाचा: PF Account मध्ये 2.50 लाखापेक्षा अधिकच्या बचतीवर कसा लागणार टॅक्स; इथे जाणून घ्या नियम .
पीएफ एटीएम मधून काढणं कसं शक्य होणार?
नोकरदारांना बॅंकेच्या एटीएम कार्ड प्रमाणे PF withdrawal card दिलं जाईल. एकूण पीएफ च्या 50% पीएफ काढण्याची मर्यादा असणार आहे. दरम्यान ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागू शकतो याची माहिती मिळू शकलेली नाही पण यंत्रणा सध्या या कामासाठी अंतिम टप्प्यात आहे.
सध्या EPFO चे 70 मिलियन पेक्षा अधिक अॅक्टिव्ह कॉन्ट्रिब्युटर आहेत. सध्या पीएफ काढण्याच्या अन्य नियमांत कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. नोकरदार नोकरीत असताना पूर्ण पीएफ काढू शकणार नाहीत. नोकरदार 1 महिना बेरोजगार असल्यास 75% रक्कम काढू शकतात तर दोन महिन्यांनंतर ते उर्वरित सारी रक्कम काढु शकतात.