भारतातील कोविड-19 (COVID-19) संक्रमितांच्या संख्ये वाढ झाली आहे. तसेच, कोविडचा नवा व्हेरिएंट जेएन-वन (New Covid Variant JN.1 In India) संक्रमित रुग्णांची देशातील संख्या 21 इतकी आहे. त्यापैकी 19 रुग्ण हे गोवा आणि महाराष्ट्र आणि केरळ राज्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. नीती आयोगाचे सरकारी थिंक टँकचे सदस्य व्हीके पॉल यांनी ही माहिती दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडून कोरोनास्थितीचा आढवा
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी देशभरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या सेख्येच्या वाढीबाबत आढवा घेतला. यामध्ये त्यांनी कोविडविरोधातील लढाईसंदर्भात सद्य परिस्थिती आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या तयारीबाबत माहिती घेतली. कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटला घाबरण्याचे कारण नाही. मात्र, आपण सर्वांनी काळजी घेणे आणि सतर्क राहणे महत्त्वाचे आहे, असेही मांडवीय म्हणाले. या वेळी त्यांनी केंद्र आणि राज्य प्राधिकरणांमध्ये अखंड समन्वय साधण्याचे आवाहन केले. कोविड विरोधात लढण्यासाठी सर्वोत्कृष्ट पद्धती सामायिक करण्यासाठी दोन्ही स्तरांवर दर तीन महिन्यांनी मॉक ड्रिल आयोजित करण्याबाबतही सूचना केली. (हेही वाचा, नवीन कोविड व्हेरीएंटचे भारतात 21 रुग्ण; लॅब चाचणीत पुष्टी)
'नव्या कोविड व्हेरीएंटविरुद्ध लढण्यासाठी सज्जता हवी'
मनसूख मांडवीय यांनी पुढे बोलताना सांगितले की, कोरोनाव्हायरसच्या नवीन आणि त्याच्या नव्या व्हेरीएंटविरुद्ध लढ्यासाठी आपण सज्ज राहणे अतिशय महत्त्वाचे आहे. याबाबत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने निवेदन दिल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, कोविडचे कार्यक्षम व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी केंद्र आणि राज्यांमध्ये सुरळीत समन्वय ठेवण्यास सांगितले. तसेच, आम्ही केंद्र आणि राज्य या दोन्ही स्तरांवर दर तीन महिन्यांनी एकदा मॉक ड्रिल करू आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करू, अशी ग्वाहीही आरोग्य मंत्र्यांनी दिली. (हेही वाचा, Modi Government Covid Advisory: भारतात आढळला JN.1 विषाणूचा पहिला रुग्ण,कोविड-19 रुग्णांध्येही वाढ; केंद्राकडून राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी)
मनसुख मांडवीय यांनी सांगितले की, कोविडचा धोका कायम आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये आढळणारी लक्षणे आणि त्यांच्या तीव्रतेचे निरीक्षण करण्याच्या आवश्यकतेवर जोर दिला. जागतिक आणि देशांतर्गत कोविड परिस्थितीवरील माहिती देताना आरोग्य मंत्रालयाचे सचिव सुधांश पंत यांनी गेल्या दोन आठवड्यात सक्रिय प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे सांगितले. दरम्यान, कोविडमुळे रुग्णालयात दाखल होण्याच्या दरांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही, असे ते म्हणाले. पंत यांनी केरळ, महाराष्ट्र, झारखंड आणि कर्नाटक यांसारख्या राज्यांमध्ये दैनंदिन पॉझीटीव्ही दरात वाढ झाल्याचे निदर्शनास आणले. (हेही वाचा, Karnataka’s Mask Advisory: कोरोना रिटर्न्स!! केरळमध्ये कोरोना प्रकरणे वाढल्याने कर्नाटकात ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आला मास्क लावण्याचा सल्ला)
जेएन-वन या नव्या कोविड-19 व्हेरीएंटचे भारतात आतापर्यंत 21 रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांचे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासले असता त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. प्राप्त माहितीनुसार, नव्या व्हेरीएंटचे 19 रुग्ण एकट्या गोवा राज्यात आढळून आले आहेत. तर महाराष्ट्र आणि केरळ राज्यांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय यांनी कोविड-19 संक्रमीत रुग्णांची वाढत असलेली संख्या आणि देशभरातील आरोग्य विभागाची तयारी याबाबत आढवा घेतला.