16 डिसेंबर पासून NEFT ची सुविधा ग्राहकांसाठी 24 तास सुरु राहणार
बँक (Photo Credits: Twitter)

आरबीआयने (RBI) डिजिटल पद्धतीला चालना देण्यासाठी एनईएफटीची सुविधा ग्राहकांसाठी येत्या 16 डिसेंबर पासून 24 तास सुरु राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आरबीआयकडून करण्यात आलेल्या विधानात असे म्हटले आहे की, ही सुविधा ग्राहकांना पूर्ण आठवडाभर चालू राहणार आहे. सध्या सकाळी 8 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आणि तिसऱ्या शनिवारी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध असते. परंतु आता एनईफटी सुविधा संपूर्ण आठवडाभर सुरु ठेवण्यात येणार असल्याचे ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

आरबीआयने एका अधिसुचनेत असे म्हटले होते की, एनईएफटी सुविधा आता 24 तास सुरु राहणार आहे. तसेच ग्राहकांना त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे एनईफटीच्या सुविधेचा वापर करताना कोणताही अडथळा येणार नाही. त्याचसोबत या सुविधेसंबंधित आवश्यक यंत्रणा सुरु करण्यास सुद्धा बँकांना सांगितले आहे. तर एनईएफटी सुविधेच्या माध्यमातून पैसे एका खात्यामधून दुसऱ्या खात्यात अवघ्या काही वेळातच पाठवता येतात. या सुविधेत 50 हजार रुपयांपर्यंत पाठवता येतात. काही विशेष कामांसाठी पैसे ट्रान्सफर करण्यासाठी मर्यादा वाढवून दिली जाते.(को-ऑपरेटिव्ह बँकांसाठी RBI लवकरच लागू करणार नवे नियम)

 तसेच आरबीआय लवकरच पीपीआय कार्ड लॉन्च करणार आहे. पीपीआय कार्डसाठी युजर्सला बँक खात्यामधून रिचार्ज करता येणार आहे. या कार्डचा उपयोग कोणत्याही प्रकारचे बिल किंवा खरेदीसाठी वापरता येणार आहे. यासंबंधित अधिक माहिती 31 डिसेंबर पर्यंत देण्यात येणार आहे. पीपीआय बँकमध्ये पैसे भरण्यासाठी डेबिट कार्डचा वापर करता येणार आहे. क्रेडिट कार्डचा सुद्धा यासाठी उपयोग करु शकता. दुसऱ्या पीपीआयच्या मदतीने एका महिन्यापर्यंत अधिकाधिक 50 हजार रुपयापर्यंत रिचार्ज करु शकणार आहेत.