रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) प्रीपेड पेमेंट इन्ट्रूमेंट (PPI) लॉन्च करणार असल्याची माहिती दिली आहे. याचा उपयोग 10 हजार रुपयांपर्यंत वस्तू खरेदीसाठी किंवा एखाद्या सर्विससाठी करता येणार आहे. डिजिटल यंत्रणेला चालना देण्यासाठी आरबीआयकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आज आरबीआयकडून मॉनिटरी पॉलिसी बाबत ही आवाहन करण्यात आले आहे. आरबीआयकडून देण्यात आलेल्या विधानात असे म्हटले आहे की, पीपीआय कार्ड युजर्सला बँक खात्यामधून रिचार्ज करु शकता. या कार्डचा उपयोग कोणत्याही प्रकारचे बिल किंवा खरेदीसाठी वापरता येणार आहे. यासंबंधित अधिक माहिती 31 डिसेंबर पर्यंत देण्यात येणार आहे.
पीपीआय बँकमध्ये पैसे भरण्यासाठी डेबिट कार्डचा वापर करता येणार आहे. क्रेडिट कार्डचा सुद्धा यासाठी उपयोग करु शकता. दुसऱ्या पीपीआयच्या मदतीने एका महिन्यापर्यंत अधिकाधिक 50 हजार रुपयापर्यंत रिचार्ज करु शकणार आहेत. त्याचसोबत बँककडून मॉनिटरी पॉलिसीचे सुद्धा आवाहन करण्यात आले आहे. तसेच रेपो रेट दरात ही आरबीआयकडून कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. 2019 मध्ये आतापर्यंत पाचवेळा आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे. सध्या रेपो रेट 5.15 टक्के आहे. बँक रेट 5.40 टक्के आणि रिवर्स रेपो रेट 4.90 टक्के आहे.(को-ऑपरेटिव्ह बँकांसाठी RBI लवकरच लागू करणार नवे नियम)