प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सरकार प्राधान्यक्रमाने उपक्रम राबवत असले तरी त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (National Crime Records Bureau) अर्थातच एनसीआरबी (NCRB) ने दिलेल्या माहितीनुसार, सन 2021 या केवळ एका वर्षात तब्बल 1.6 लाख प्रवाशांनी रस्ते अपघातात आपले प्राण गमावले (Road Accident Death) आहेत. आतापर्यंतच्या एकूण वर्षांतील हा सर्वात अधिक आकडा आहे. सरकारने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विविध उपक्रम आणि प्रतिबंधात्मक काळजी घेऊनही रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण अधिकच आहे.
नॅशनल क्राईम रेकोर्ड ब्युरोने (NCRB) नेहमी देशभरातील विविध गुन्ह्यांची आकडेवारी जाहीर करते. यात देशभरातील विविध राज्यांतील पोलीस स्थानकांमध्ये असलेले एकूण गुन्ह्यांचा आणि त्यांच्या आकेडवारीचा समावेश असतो. यंदाही ही आकडेवारी जाहीर झाली. त्यानुसार देशात 2021 या वर्षात प्रतिदिन 426 म्हणजेच प्रत्येक तासाला सरासरी 18 जणांचा मृत्यू झाला. पाठीमागच्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये मृतांचा हाच आकडा केवळ 56 हजार इतका होता. (हेही वाचा, St Bus Accident At Dapoli: एसटी बसची दापोली वळणावर समोरासमोर धडक, 25 प्रवासी जखमी, चालकाची प्रकृती गंभीर)
रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूाबत चिंता व्यक्त केली जात आहे. रस्ता सुरक्षेचे नियम पाळण्याचे अवाहन करुन त्या दृष्टीने खबरदारी घेऊनही मृत्यूचे इतके प्रमाण पाहता आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धक्कादायक म्हणजे रस्ते अपघात होणाऱ्या मृत्यूंपैकी सर्वाधिक संख्या ही दुचाकीस्वारांची आहे. रस्ते अपघातांमधील सरासरी पाहता 100 मृतांमाघे 44 दुचाकीस्वार असे असे प्रमाण आहे. एका वर्षात तब्बल 69,240 दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची एनसीआरबीची माहिती आहे. 2019 च्या तुलनेत हे प्रमाण 18% नी वाढले आहे.