'मन की बात' मधून पंतप्रधान 'नरेंद्र मोदी' यांनी मांडली जलसंवर्धनची त्रिसूत्री, जाणून घ्या मोदींचा दुष्काळ हटाव फंडा

नरेंद्र मोदी यांनी आज नवीन सरकार मधील पहिल्या मन की बात सत्रातून देशातील पाणी समस्यांवर लक्ष देत जलसंवर्धन अभियान सुरु करण्याचे आवाहन केले आहे. देशात जलसंवर्धनासाठी सरकार व जनतेने एकत्र येण्याची गरज आहे असेही ते यावेळी म्हणले आहेत.

बातम्या Siddhi Shinde|

Prime Minister Narendra Modi (Photo Credits: ANI)

30 जून, रविवारी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आकाशवाणी वरून मन की बात (Mann Ki Baat)  या कार्यक्रमाच्या माध्यमाने देशवासीयांशी संवाद साधला. यामध्ये मोदींनी अपेक्षेप्रमाणे लोकसभा निवडणुकीचा निकाल, व देशातील समस्यांवर भाष्य केले. यंदा देशासमोर पाण्याच्या अभावी दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे या कडे लक्ष देऊन मोदींनी आपल्या भाषणातून जलसंवर्धन विषयावर जोर दिला होता. देशवासियांना स्वच्छता अभियानाचा (Swachh Bharat Mission) दाखला देत पाणी वाचवा अभियानाला सुरुवात करण्याचे आवाहन मोदींनी केले आहे , "पाण्याचा एक एक थेंब महत्वाचा आहे जो वाचवण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घायला हवा" असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणातून जलसंवर्धनाची त्रिसूत्री सुद्धा मांडली आहे. चला तर पाहुयात काय आहे मोदींचा दुष्काळ हटाव फंडा..

जलसंवर्धन त्रिसूत्री

-खेळ, चित्रपट व अन्य क्षेत्रातील प्रसिद्ध सेलिब्रिटी, मीडिया तसेच सामान्य नागरिकांनी पाणी वाचवण्यासाठी नवनवीन कल्पक मोहिम सुरु कराव्यात. तसेच त्याबाबत जागृती घडवून आणावी

-जनतेने आपल्याला ज्ञात असलेल्या पारंपरिक पद्धतीने जलसंवर्धन करायला सुरु करावे तसेच याबाबत इतरांना सुद्धा माहिती द्यावी

-तुम्हाला या क्षेत्रात काम करण्याऱ्या सामाजिक संस्था माहित असल्यास त्याविषयी सरकारला माहिती कळवावी

जलशक्ती उपक्रम

देशातील पाणी समस्या हाताळण्यासाठी सरकारतर्फे जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करण्यात आल्याची घोषणा देखील मोदींनी केली. या समितीमार्फत देशातील पाण्याच्या समस्यांवर तात्काळ उपाय शोधण्याच प्रयत्न केला जाणार आहे. तसेच यापुढे जलसंवर्धन अभियानाची जागरूकता निर्माण करण्याकरिता नागरिकांनी #Janshakti4jalshakti या हॅशटॅगचा वापर करावा असेही सांगण्यात आले.

औरंगाबाद: हंडाभर पाण्यासाठी दहा वर्षाचा चिमुकला करतो रेल्वेचा 14 किमी प्रवास, गावात दुष्काळाचे सावट

दरम्यान देशात होणाऱ्या पावसापैकी केवळ 8% पाणी हे संवर्धनासाठी वापरले जाते यामध्ये वाढ होण्याची गरज आहे, ही बाब लक्षात घेऊन दुष्काळाला हटवण्यासाठी कोणताही एक सरळ फॉर्म्युला लागू करणे शक्य नाही त्यासाठी आपण सर्वानी पुढाकार घ्यायला हवा असा संदेश देखील मोदींनी दिला आहे.

e class="twitter-tweet" data-lang="en">

Use #JanShakti4JalShakti to upload your content relating to water conservation. #MannKiBaat pic.twitter.com/4q5RSSY3WI

— PMO India (@PMOIndia) June 30, 2019

जलशक्ती उपक्रम

देशातील पाणी समस्या हाताळण्यासाठी सरकारतर्फे जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करण्यात आल्याची घोषणा देखील मोदींनी केली. या समितीमार्फत देशातील पाण्याच्या समस्यांवर तात्काळ उपाय शोधण्याच प्रयत्न केला जाणार आहे. तसेच यापुढे जलसंवर्धन अभियानाची जागरूकता निर्माण करण्याकरिता नागरिकांनी #Janshakti4jalshakti या हॅशटॅगचा वापर करावा असेही सांगण्यात आले.

औरंगाबाद: हंडाभर पाण्यासाठी दहा वर्षाचा चिमुकला करतो रेल्वेचा 14 किमी प्रवास, गावात दुष्काळाचे सावट

दरम्यान देशात होणाऱ्या पावसापैकी केवळ 8% पाणी हे संवर्धनासाठी वापरले जाते यामध्ये वाढ होण्याची गरज आहे, ही बाब लक्षात घेऊन दुष्काळाला हटवण्यासाठी कोणताही एक सरळ फॉर्म्युला लागू करणे शक्य नाही त्यासाठी आपण सर्वानी पुढाकार घ्यायला हवा असा संदेश देखील मोदींनी दिला आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change