![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/11/Narayana-Murthy-Sudha-Murty-1-380x214.jpg)
इन्फोसिसचे सह-संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती (Narayana Murthy) आणि लेखिका-सुधा मूर्ती (Sudha Murty) हे तिसऱ्यांदा आजी-आजोबा झाले आहेत. मुलगा रोहन (Aparna Murty) आणि स्नुषा अपर्णा कृष्णन ( Aparna Krishnan) यांनी बाळाला जन्म दिला. त्यामुळे मूर्ती कुटुंबीयांना दिवाळीत आनंदाचा डबल धमाका अनुभवता आला आहे. मूर्ती कुटुंबामध्ये 10 नोव्हेंबर रोजी बेंगळुरु येथे चिमुल्या पाहुण्याचे आगमन झाले. मुर्ती कुटुंबात अलिकडील काळात जन्मलेले हे तीसरे बालक आहे. दरम्यान, प्रसूतीनंतर आई आणि मुलगा दोघांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या चिमुकल्याचे नाव एकग्रह ठेवण्यात आल्याचे समजते. हे एक अतूट लक्ष आणि दृढनिश्चय दर्शवणारे संस्कृत नाव आहे. जे महाभारतातील अर्जुनाने चित्रित केलेल्या "एकग्रह" या पात्रापासून प्रेरित होते. भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायातही या नावाचे महत्त्व आहे. ज्यात आत्म-साक्षात्कारासाठी योग आणि ध्यान यावर जोर देण्यात आला आहे.
रोहन मूर्ती
चाळीस वर्षांच्या रोहन मूर्ती यांनी हार्वर्ड विद्यापीठातून पीएचडी केले आहेत. ते संगणक शास्त्रज्ञ-उद्योजक असून त्यांनी Soroco या डेटा-आधारित सॉफ्टवेअर फर्मची स्थापना केली आहे. जी संस्थांमधील कामाच्या पद्धतींना संबोधित करण्यासाठी डेटाचे कृतीयोग्य अंतर्दृष्टीत रूपांतर करण्याचे काम करते.
अपर्णा कृष्णन
पूर्वी सोरोकोच्या ऑपरेशन्सच्या जनरल मॅनेजर राहिलेल्या अपर्णा कृष्णन सध्या मूर्ति मीडियाच्या प्रमुखपदी आहेत. मीडिया कंपनीने "स्टोरी टाइम विथ सुधा अम्मा" ही YouTube मालिका तयार केली आहे. ज्यामध्ये सुधा मूर्ती यांच्या लहान मुलांच्या पुस्तकांचे अॅनिमेटेड शो आहेत.
रोहन मूर्ती आणि अपर्णा कृष्णन विवाह
Infosys सह-संस्थापक नंदन निलेकणी, क्रिश गोपालकृष्णन, SD शिबुलाल आणि के दिनेश तसेच बायोकॉनचे प्रमुख किरण मुझुमदार-शॉ यांच्यासह जवळचे कुटुंब आणि मित्र उपस्थित बंगळुरु येथे रोहन मूर्ती आणि अपर्णा कृष्णन हे जोडपे विवाहबद्ध झाले. या जोडप्याने 2019 मध्ये लग्न केले.
नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची इतर दोन नातवंडे, कृष्णा आणि अनुष्का या अक्षता मूर्ती आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या मुली आहेत. सुधा मूर्ती, या त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी ओळखल्या जातात. आपल्या नातींबद्दल त्यांनी अनेकदा प्रेम व्यक्त केले आहे. त्यांची अलीकडील मुलांची काही पुस्तके त्यांनी नातवंडांना समर्पित केली आहेत.