डोनाल्ड ट्र्म्प । Photo Credits: Twitter

'नमस्ते' असं म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी भाषणाला सुरूवात केली. दरम्यान हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतामध्ये आल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. आम्ही भारताचं आदरातिथ्य कायम लक्षात ठेऊ. पंतप्रधान यांचे भारतासाठीचं दिवस रात्र राबणं स्त्युत्य आहे असं म्हणताना एक चहावाला ते भारताचा पंतप्रधान हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी असल्याचं सांगताना त्यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने विकास केला असल्याचं म्हटलं आहे. मोटेरा स्टेडियमवरून भारतीयांना संबोधित करताना त्यांनी भारताच्या 'विविधतेमध्ये असलेल्या एकतेचं' कौतुक केले आहे. प्रेमाचा संदेश घेऊन भारतामध्ये आलो आहे. असं सांगताना भारत- अमेरिका जगाला सतातवत असणार्‍या दहशतवादाविरूद्ध एकत्र लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळेस त्यांनी भारतासोबत 3 बिलियम अमेरिकन डॉलर्सचं डिफेंस डील देखील जाहीर केले आहे. आम्हांला भारताचा गर्व आहे. 70 वर्षामध्ये लोकशाही बळकट करण्यासोबतच आर्थिक विकास करणं हे स्त्युत्य असल्याचं म्हणत भारताने जगाला मानवतेचा धडा दिला आहे. असे डोनाल्ड ट्र्म्प म्हणाले आहेत. Donald Trump India Visit: डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेत अमेरिका-भारत यांच्यातील मैत्री घट्ट झाली- पंतप्रधान नरेंद्र मोदी.  

दरम्यान डोनाल्ड ट्र्म्प यांनी स्वामी विवेकानंद यांच्यापासून बॉलिवूड, क्रीडा क्षेत्रातील सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीचं कौतुक केलं. दिवाळी, होळी यांच्या सारख्या सणांमधून जपाणार्‍या आपल्या संस्कृतीचं कौतुक केले आहे. दरम्यान भारतामध्ये विविधता असली तरीही त्यामध्ये एकात्मता आम्हांलाही प्रेरणा देते. गणित, विज्ञान आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये भारतीयांचं योगदान विशेष आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये आपल्या मधील मैत्रीचे संबंध दृढ करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. आता आम्ही अमेरिकन मिलिटरी पुन्हा नव्या दमाने बांधण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यातील 24 आणि 25 फेब्रुवारी या दोन्ही दिवसांचे संपूर्ण शेड्युल जाणून घ्या

पुढील पिढ्यांसाठी आम्ही एकत्र काम करणार आहोत. दहशतवादाविरोधात आम्ही एकत्र लढणार आहोत. आमच्या सुरक्षा कडक करण्यामागे देशात सुरक्षा निर्माण करणं हे महत्त्वाचं समजलं जातं. पाकिस्तानामध्ये दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आयसिसचा 100% खात्मा केल्याचा उल्लेखदेखील यावेळेस त्यांनी बोलून दाखवला.

भविष्यात अंतराळ विश्वातील नवनव्या संधी आम्ही एकत्र येऊन शोधणार आहे त्यासाठी दोन्ही देश एकमेकांना मदत करेल असेही त्यांनी म्हटलं आहे. यावेळेस चांद्रयान मोहिमेचं देखील त्यांनी कौतुक केले आहे. सोबतच भारताचं खरं स्पिरीट हे पुस्तक, लॅन्डमार्क, वास्तू मध्ये नसून हजारो भारतीयांमध्ये आणि त्यांच्या स्पिरीटमध्ये आहे. तुमचा ध्येयप्राप्तीसाठीचा ध्यास स्त्युत्य आहे. देव तुमचं भलं करो. असं म्हणत त्यांनी दोन्ही देशांना शुभेच्छा दिल्या आहे.