Namaste Trump | Photo Credits: Twitter/ ANI

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्र्म्प, त्यांची मुलगी इव्हांका आणि जावई जरेड यांचे आज (24 फेब्रुवारी) दुपारी 11.30 च्या सुमारास गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले आहे. ट्र्म्प यांच्या दोन दिवसीय भारत दौर्‍याची अमेरिका आणि भारत दोन्ही देशांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मोटेरा स्टेटियमच्या उद्धाटनासोबत, साबरमती आश्रम भेट, आग्रामध्ये ताजमहाला भेट देणार आहेत. दोन दिवसांच्या या भारत दौर्‍यामध्ये ट्रम्प यांच्यासाठी 'नमस्ते प्रेसिडंट' या कार्यक्रमाचंदेखील आयोजन करण्यात आलं आहे. मोटेरा या जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवरून डोनाल्ड ट्र्म्प भारतीयांना संबोधित करणार आहेत. दरम्यान या कार्यक्रमाचं लाईव्ह स्ट्रिमिंग 'दूरदर्शन न्यूज' च्या युट्युब चॅनलवरून पाहता येणार आहे. डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यासाठी 'बुखारा' रेस्टॉरंट मध्ये साकारण्यात येतंय खास 'Trump Platter'; गुजराती शाकाहारी पदार्थांची पर्वणी चाखणार अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.

अमेरिकेमध्ये येत्या काही महिन्यात होणार्‍या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा हा भारत दौरा महत्त्वपूर्ण आहे. साबरमती आश्रमाला डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया यांनी भेट दिल्यानंतर ते मोटेरा स्टेडियमचंब उद्घाटन करणार आहेत. हे स्टेडियम सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. आज या स्टेडियमवरून 'नमस्ते ट्र्म्प' हा कार्यक्रम होणार आहे. आज दुपारी 1.05 च्या सुमारास सुमारे सव्वा लाख लोकांना दोन्ही देशाचे पंतप्रधान संबोधित करणार आहेत.

नमस्ते ट्र्म्प कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रिमिंग

आज भारतामध्ये ट्र्म्प यांचे विमान लॅन्ड होण्यापूर्वी त्यांनी हिंदी भाषेतून खास ट्वीट केले होते. ज्यामध्ये आपण भारत दौर्‍यासाठी उत्सुक आहोत. लवकरच भेटू अशा आशयाचं ट्वीट केलं होतं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या ट्वीटला प्रत्युत्तर देताना अतिथी देवो भव्। म्हणत ट्रम्प कुटुंबियांचं स्वागत केलं आहे.