MP School Boy Murder Case: मध्य प्रदेशातील जबलपूर येथे एका शाळेत संतापजनक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलाची शाळेत हत्या करण्यात आली. ही घटना शाळेच्या गेटबाहेर घडली आहे. या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर संपूर्ण शहर हादरले आहे. या प्रकरणी पोलिस शाळेचे मुख्यध्यापक आणि शिक्षकांची चौकशी केली जात आहे. (हेही वाचा- काकडी खाल्याने 5 वर्षीय बालकाचा मृत्यू, कुटुंबातील सदस्य रुग्णालयात दाखल, मध्य प्रदेशातील घटना)
मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी शाळेच्या ९ वीच्या विद्यार्थ्यांने ८ वीच्या विद्यार्थ्याची भोसकून हत्या केली आहे. शाळेच्या गेटच्या बाहेर दोन्ही विद्यार्थ्यांची हाणामारी झाली. या घटनेत ९वीच्या विद्यार्थ्यांने अल्पवयीन मुलाच्या पोटात भोकसले. दोन्ही विद्यार्थ्यांची मारामारी पाहून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतले.
घटनास्थळावरून आरोपीला पकडण्यासाठी स्थानिकांनी धाव घेतली. स्थानिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी आरोपीवर मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
पोलिसांनी सांगितले की, रोहित चक्रवर्ती असं मृत मुलाचे नाव आहे. तो नटवारा येथील रहिवासी होता. तर किशोर असं आरोपीचे नाव आहे. तो मेहगव्हाणचा रहिवासी आहे. किशोर आणि रोहित यांच्या एका दिवसांपूर्वीच भांडण झालं होते. एकमेकांनी शिवीगाळ करत मारहाण देखील केली. याच गोष्टीचा राग मनात भरत रोहितची हत्या केली. सकाळी सहाच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले होते. या प्रकरणी इतर पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनावर सुरक्षतेचा प्रश्न उपस्थित केला आहे.