ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटालाच खरी शिवसेना घोषित केल्यानंतरही ठाकरे गटाकडून पक्षनिधी काढल्याचा शिंदे गटाचा आरोप आहे. या प्रकरणी ईओडब्ल्यूकडे करण्यात तक्रार करण्यात आली आहे. 5 मार्च रोजी देसाई यांना चौकशीसाठी बोलावले आहे. शिवसेनेचे ठाकरे पक्षाचे नेते अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटालाच खरी शिवसेना घोषित केल्यानंतरही उद्धव गटाकडून पक्षनिधी काढल्याचा शिंदे गटाचा आरोप आहे. (हेही वाचा - Shiv Sena MLAs Disqualification: ठाकरे गटाच्या विधानसभा अध्यक्षांच्या आमदार अपात्रता प्रकरणी निकालाला आव्हान करणार्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 7 मार्चला!)
ठाकरे गटाच्या अडचणीच वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आता कारवाईला वेग आला आहे. अनिल देसाई यांना 5 मार्च रोजी देसाई यांना चौकशीसाठी बोलावले आहे. ठाकरे गटाने शिवसेनेच्या पक्षनिधीतून 50 कोटी रुपये काढल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. दरम्यान आता अनिल देसाई यांना समन्स आल्याने आगामी काळात पक्षनिधीचा वाद चव्हाट्यावर येणार आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला फेब्रुवारी २०२३ मध्ये खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली.
या प्रकरणात संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यालाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे विरुद्ध शिंदे असा वाद रंगणार आहे. राज्यातील राजकारणातून मोठं वृत्त हाती आलं आहे . ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले आहे.