मुंबई मधील प्रख्यात बिल्डर पारस पोरवाल (Paras Porwal) यांनी आत्महत्या (Suicide) करून आपलं जीवन संपवलं आहे. पारस यांचा मृत्यूची बातमी धक्कादायक आणि बिल्डर जगतासाठी हळहळ व्यक्त करणारी आहे. आज (20 ऑक्टोबर) दक्षिण मुंबई मध्ये भायखळ्यातील त्यांनी राहत्या घराच्या इमारतीमध्ये 23व्या मजल्यावरून खाली उडी मारली. त्यांच्या आत्महत्येनंतर पारस पोरवाल यांचा मृतदेह पोस्ट मार्टम साठी पाठवण्यात आला असून त्यांच्या घरी सुसाईड नोट देखील मिळाली आहे.
मुंबई पोलिसांनी काळाचौकी पोलिस स्थानकामध्ये पारस पोरवाल यांच्या मृत्यूची नोंद केली आहे. सध्या या आत्महत्याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती देखील मुंबई पोलिसांनी दिली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार पोरवाल यांच्या आत्महत्येमागे आर्थिक नुकसान असल्याची चर्चा आहे. त्यांच्या सुसाईड नोट मध्ये मात्र कुणाला आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरू नये असंही सांगण्यात आले आहे. हे देखील नक्की वाचा: Model Suicide Case in Mumbai: मुंबई मध्ये 30 वर्षीय मॉडेलची हॉटेल रूम मध्ये गळफास घेत आत्महत्या .
पहा ट्वीट
A Mumbai-based real estate developer, Paras Porwal died by suicide after he jumped from the 23rd floor of a building. Mumbai's Kalachowki police station registers case. Body sent for post-mortem, suicide note found, further probe on: Mumbai Police
— ANI (@ANI) October 20, 2022
पारस पोरवाल यांनी दक्षिण मुंबई मध्ये अनेक इमारती बांधल्या आहेत. मराठी माणसाला मुंबईत घर मिळावं म्हणून त्यांनी अनेक प्रकल्प केले होते. अनेक चाळींच्या रिडेव्हलपमेंट प्लॅन्सची कामं त्यांनी केली आहेत.