Model Suicide Case in Mumbai: मुंबई मध्ये 30 वर्षीय मॉडेलची हॉटेल रूम मध्ये गळफास घेत आत्महत्या
मॉडेलने सुसाईड नोट मध्ये 'माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नये. मी आनंदी नव्हती मला फक्त शांतता हवी होती'.
मुंबई (Mumbai) मध्ये अंधेरी (Andheri) भागात 40 वर्षीय मॉडेलचा मृतदेह हॉटेलच्या रूम मध्ये लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळला आहे. ही घटना काल 29 सप्टेंबरची आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मॉडेलने हॉटेल मध्ये बुधवारी रात्री 8 च्या सुमारास चेक इन केले होते. त्यानंतर रात्रीचे जेवण देखील ऑर्डर केले होते.
हाऊसकिपिंग स्टाफ कडून वारंवार हाक मारूनही या मॉडेलने दरवाजा न उघडल्याने हॉटेलच्या मॅनेजरने पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. पोलिस हॉटेल वर आल्यानंतर त्यांनी मास्टर की च्या माध्यमातून दरवाजा उघडला तेव्हा त्यांना ती लटकलेल्या अवस्थेमध्ये दिसली. पोलिसांना हॉटेल रूम मध्ये सुसाईड नोट मिळाली. मीडीया रिपोर्ट्सनुसार ही मॉडेल लोखंडवाला मधील यमुना नगर सोसायटीची रहिवासी होती.
पहा ट्वीट
Maharashtra | A 30-year-old model died by suicide, her body was found hanging from a fan in a hotel room in Andheri area of Mumbai, Versova police registered a case under ADR and started further investigation. Police also recovered a suicide on the spot: Mumbai Police
— ANI (@ANI) September 29, 2022
मॉडेलने सुसाईड नोट मध्ये 'माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नये. मी आनंदी नव्हती मला फक्त शांतता हवी होती'. असे लिहले होते. वर्सोवा पोलिसांनी या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. तिचा मृत्यू Accidental Death Report खाली नोंदवण्यात आला आहे. सध्या तिचा मृतदेह पोस्ट मार्टम साठी पाठवला आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 30, 2022 08:49 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

