महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ( Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) च्या महिला लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळण्यास सुरूवात झाली आहे. राज्य सरकार कडून सार्या पात्र महिलांना डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत 1500 रूपये मिळणार आहेत. दरम्यान महायुतीने जाहीरनाम्यामध्ये महिलांना हे पैसे 1500 वरून 2100 करून दिले जातील असं आश्वासन देण्यात आलं होतं त्यामुळे आता महायुतीच्या सरकार मध्ये त्यांची पुन्हा नव्याने सत्ता आल्यानंतर महिलांना नेमके किती रूपये मिळणार याची उत्सुकता लागली आहे.
महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना बद्दल सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. आगामी अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 देण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. सध्या आचारसंहिता लागल्याने स्थगित झालेला हफ्ता महिलांच्या खात्यामध्ये टाकण्याचे काम सुरू आहे. नोव्हेंबर महिन्याचा लाभ महिलांना मिळाला आहे आता डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे. नक्की वाचा: Ladki Bahin Yojana Installment: खुशखबर! लाडक्या बहीणींना आजपासून मिळणार सहाव्या हप्त्याची रक्कम; डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद .
डिसेंबर अखेरीपर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणर
आदिती तटकरे यांनी महिलांना डिसेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत पैसे मिळतील. तर नव्या रजिस्टर लाभार्थ्यांची प्रक्रिया काहीशी थांबल्याचं पहायला मिळालं आहे. एबीपी माझा शी बोलताना आदिती यांनी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया 15 ऑक्टोबर पर्यंत होती. सध्या यापूर्वीच रजिस्ट्रेशन पूर्ण झालेल्यांना पैसे दिले जात आहे. त्यामुळे ज्यांचे फॉर्म स्वीकारले गेले आहेत त्यांना आधी पैसे मिळतील.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल नाही
. आता पुन्हा एकदा नोंदणी सुरू करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. तसेचलाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.