Mukesh Ambani | File Image | (Photo Credits: PTI)

देशातील दुसरं श्रीमंती व्यक्तीमत्व मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे लवकरच आणखी एक मोठा करार करणार आहे. रिलायन्स (Reliance) आणि जर्मन रिटेलर मेट्रो कॅश अँड कॅरी (German Retailor Cash and Carry) खरेदी करणार असल्याची आंतरराष्ट्रीय बाजारात चर्चा आहे. मेट्रो कॅश अँड कॅरी कंपनी खरेदी झाल्यानंतर त्यांचे 31 स्टोअर्स रिलायन्सच्या (Reliance Store) ताब्यात येणार आहेत. या स्टोअर्सच्या माध्यमातून मल्टि ब्रॅण्ड रिटेल चेन (Multi Brand Retail Chain) तयार करण्यात येणार आहे. तरी टेलिकॉम सेक्टर (Telecom Sector) नंतर रिटेल क्षेत्रात येण्यासाठी मुकेश अंबानींनी (Mukesh Ambani) आता कंबर कसली आहे. तरी ही कंपनी अंबानींने खरेदी केल्यास थेट डिमार्ट (D-Mart) विरुध्द रिलायन्स रिटेल (Reliance Retail) अशी स्पर्धा बघायला मिळणार आहे.

 

रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industry)  आपल्या 45 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स रिटेल FMCG क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची घोषणा केली होती. तरी आता रिलायन्स उद्योग समूहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांच्या जयंतीचा मुहूर्त साधत मुकेश अंबानी हा महत्वपूर्ण करार करणार असल्याची माहिती मिळत आहे. जर्मनी (Germany) कंपनी भारताच्या मालकीची होणार असल्याने देशाचा देखील आर्थिक फायदाच होणार आहे. तर भारतीय बाजारपेठेत अंबानींच्या या नव्या प्रयगास कसा प्रतिसाद मिळतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. (हे ही वाचा:- Mukesh Ambani Advice To Youth: 5G पेक्षाही माताजी पिताजी अधिक महत्वाचे, टेलिकॉम किंग मुकेश अंबानींचा देशातील युवा पिढीला मोलाचा सल्ला)

 

रिलायन्स उद्योग (Reliance Industry) समूहाकडून रिटेल क्षेत्रात उतरण्याची तयारी सुरू झाली आहे. दोन्ही कंपन्यांमधील हा करार 500 दशलक्ष युरो म्हणजेच सुमारे 4060 कोटी रुपयांचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 'मेट्रो' (Metro) कंपनी खरेदी केल्यानंतर 'रिलायन्स रिटेल'ची (Reliance Retail) डीमार्ट (D-Mart) आणि हायपर मार्केटशी थेट स्पर्धा असणार आहे. बिग बाजारसोबत त्यांनी करार केला. रिटेल क्षेत्रात उतरण्याच्या दृष्टीने रिलायन्सकडून एफएमसीजी सेक्टरमधील काही छोट्या कंपन्यादेखील खरेदी करण्यात येत आहेत.