Mukesh Ambani यांनी सलग दुसर्‍या वर्षी Reliance Industries मधून वेतन न घेणं केलं पसंत!
Mukesh Ambani | Reliance Jio | Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: File Photo)

कोट्याधीश उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी सलग दुसर्‍या वर्षी Reliance Industries मधून आपलं वेतन घेतलेले नाही. कोरोना संकट काळामध्ये व्यवसायाला बसलेल्या धक्क्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वतःहून वेतन घेणं टाळलं आहे. रिलायन्सच्या वार्षिक अहवालामध्ये मुकेश अंबानी यांचा 2020-21 मधील वेतन 'शून्य' दाखवण्यात आले आहे. जून 2020 मध्ये Reliance Industries चे एमडी आणि चेअरमन मुकेश अंबानी यांनी स्वेच्छेने पगार नाकारला होता. 2021-22 साठी देखील त्यांनी आपला हा निर्णय कायम ठेवला आहे.

मुकेश अंबानींनी त्यांच्या पदासाठी असलेले कोणतेही भत्ते, कमिशन, स्टॉक ऑप्शन्स घेणं टाळलं आहे. तत्पूर्वी त्यांचे वेतन अंदाजे 15 कोटी पर्यंतच त्यांनी सीमित केले होते. त्याचे चुलत भाऊ निखिल आणि हेतल मेसवानी यांचे मानधन 24 कोटी रुपयांवर कायम राहिले, परंतु यावेळी 17.28 कोटी रुपयांचे कमिशन समाविष्ट आहे. कार्यकारी संचालक पीएमएस प्रसाद आणि पवन कुमार कपिल यांच्या मानधनात किरकोळ घट झाली आहे. हे देखील नक्की वाचा: Mukesh Ambani Resign: मुकेश अंबानी यांचा रिलायन्स जिओच्या संचालक मंडळाचा राजीनामा; मुलगा आकाश अंबानी याच्यावर सोपवली जबाबदारी .

मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता या कंपनीच्या संचालक मंडळातील बिगर कार्यकारी संचालक पदी आहेत. नीता अंबानींनी वर्षभरासाठी पाच लाख रुपये सिटिंग फी आणि आणखी 2 कोटी रुपये कमिशन घेतले आहे. मागील वर्षी नीता अंबानींना 8 लाख रुपये सिटिंग फी आणि 1.65 कोटी रुपये कमिशन मिळाले होते. अंबानी व्यतिरिक्त, RIL बोर्डात मेसवानी बंधू, प्रसाद आणि कपिल हे पूर्णवेळ संचालक आहेत.