मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) सागर (Sagar) जिल्ह्यात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे न्यायालयाने एका आरोपीला 170 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तुम्हाला हे ऐकून थोडे आश्चर्य वाटेल, परंतु हे सत्य आहे. नासिर मोहम्मद (55) हा गुजरातचा रहिवासी आहे. सागर जिल्ह्य़ातील सदर पोलीस ठाण्यात 34 जणांनी नसीरविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने सर्व प्रकरणात आरोपीला 5 वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रुपये दंड ठोठावला. अशाप्रकारे सर्व खटले एकत्र करून न्यायालयाने त्याला एकूण 170 वर्षांची शिक्षा सुनावली.
हे प्रकरण फसवणुकीचे आहे. कपड्यांची फॅक्टरी सुरू करण्याच्या नावाखाली हा बदमाश लोकांकडून पैसे उकळायचा. त्याने एक-दोन नव्हे तर 34 जणांना फसवणुकीचा शिकार बनवले. साधारण 2019 मध्ये सागर जिल्ह्यातील भैंसा आणि सदर गावातील रहिवाशांनी आरोपींविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केल्यावर ही बाब उघडकीस आली. नासिरने 34 जणांची 72 लाखांची फसवणूक केली होती.
फसवणुकीचे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. तेव्हापासून हे प्रकरण न्यायालयात सुरू होते. सरकारी वकील रामबाबू रावत यांनी सांगितले की, नासिरला एकापाठोपाठ एक शिक्षा होतील, असे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे. म्हणजे एका प्रकरणाची शिक्षा पूर्ण झाल्यावर दुसऱ्या केसची शिक्षा सुरू होईल. (हेही वाचा: TCS Bribes-For-Jobs Scam: आयटी कंपनी टीसीएसमध्ये नोकरी घोटाळा; जॉब देण्याच्या बदल्यात घेतली 100 कोटींची लाच; अनेक अधिकारी निलंबित)
त्याने लोकांना सांगितले होते. त्याने व्हिएतनाम, दुबई, कंबोडिया येथे कापडाचे कारखाने आहेत व आता त्याला इथे सागर जिल्ह्यातील गावात कापड कारखाना सुरू करायचा आहे. कारखान्यात भागीदार बनवण्याच्या नावाखाली तो लोकांकडून पैसे उकळू लागला व अशाप्रकारे त्याने 34 लोकांची 72 लाखांची फसवणूक केली. तेव्हापासून आरोपी फरार होता. न्यायालयाने आता न्यायालयाने कलम-420 अन्वये 170 वर्षांची सक्तमजुरी यासह, त्याला प्रत्येक प्रकरणात 10,000 रुपये असा दंड याप्रमाणे 3,40,000 रुपयांची दंड ठोठावण्यात आला आहे.