प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळमध्ये (Bhopal) एका 78 वर्षीय महिलेवर 37 वर्षीय व्यक्तीने बलात्कार (Rape) केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. हबीबगंज क्षेत्राचे सहाय्यक पोलीस आयुक्त वीरेंद्र कुमार मिश्रा यांनी 'पीटीआय-भाषा'ला सांगितले की, पोलिसांनी शनिवारी रात्री 37 वर्षीय राजूला 78 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली.

त्यांनी पुढे सांगितले की, पीडित महिला ही भिक मागून तिचा उदरनिर्वाह चालवते. ती मंदिराजवळील झोपडपट्टीत राहते आणि मंदिरात येणारे-जाणारे लोक तिला जेवण व पैसे देतात, त्यावरच तिचा उदरनिर्वाह चालतो. आरोपी देखील फूटपाथवर भीक मागतो. आरोपीने 26-27 ऑक्टोबरच्या मध्यरात्री शहरातील हबीबगंज पोलीस स्टेशन परिसरातील झोपडपट्टीत या वृद्ध महिलेवर बलात्कार केला.

मिश्रा म्हणाले की, पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे की, राजूने केलेल्या जबरदस्तीमुळे महिलेच्या चेहऱ्यावर आणि घशावर सूज आली होती. या महिलेला तीन मुले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकी दोघे महिलेची काळजी घेत नाहीत. महिलेचा धाकटा मुलगा तिला भोपाळला घेऊन आला होता. पुढे तिच्या मुलाच्या मृत्युनंतर ती जगण्यासाठी रस्त्यावर भीक मागू लागली. (हेही वाचा: विकृतीचा कळस ! तरुणाचा 18 वर्षीय प्रेयसीवर क्रूरपणे बलात्कार, प्रायव्हेट पार्टमध्ये घुसवला रॉड)

घटनेबाबत महिलेने सांगितले की, राजू रात्री दोन वाजण्याच्या सुमारास तिच्या झोपडीत आला. त्याने महिलेकडे भाकरी मागितली होती, पण तिच्याकडे भाकरी नव्हती. यानंतर संतापलेल्या राजूने महिलेला जमिनीवर ढकलले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. एका एनजीओच्या माध्यमातून महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ती अनेकदा राजूला जेवण द्यायची, असेही महिलेचे म्हणणे आहे. वृद्ध महिलेवर 5 दिवस रुग्णालयात उपचार करण्यात आले.