उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) उन्नावमधून (Unnao) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका तरुणाने आपल्या 18 वर्षीय प्रेयसीवर क्रूरपणे बलात्कार (Rape) केला. यादरम्यान आरोपीने प्रेयसीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला. दुसरीकडे, पीडित मुलगी रक्तस्त्रावामुळे असहाय्य झाल्यानंतर आरोपी तिला सोडून पळून गेला. काही वेळाने पीडितेचा मृत्यू झाला. पीडित मुलगी दलित कुटुंबातील असून ती बीएससीचे शिक्षण घेत होती. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रियकरावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. हे प्रकरण उन्नावमधील सदर कोतवाली भागातील आहे. पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी विद्यार्थिनीचा मृतदेह तिच्या घराच्या अंगणात रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आला.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले. यामध्ये पीडितेसोबत झालेल्या अत्याचाराची संपूर्ण कहाणी स्पष्ट झाली. यानंतर संशयाच्या आधारे पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली. त्याचा कबुलीजबाब ऐकून पोलीस अधिकारीही हैराण झाले आहेत. याप्रकरणी आणखी काही जणांचा पोलिस शोध घेत आहेत.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थीनी दोन वर्षांपासून आरोपी राजच्या संपर्कात होती. तिने आपल्या छातीवर राजचे नाव गोंदवले. पोलिसांना हा टॅटू पाहताच संशय आला, त्यानंतर कुटुंबीयांची चौकशी करत पोलीस आरोपी राजपर्यंत पोहोचले. दुसरीकडे पीडितेच्या आईने सांगितले की, ती अंगणवाडी सेविका आहे, तर तिचा पती शिक्षक आहे. ही मुलगी त्याच्या तीन मुलांपैकी सर्वात मोठी होती.
आईने सांगितले की, गुरुवारी घरी नाश्ता करून ती कामावर निघाली होती. दोन्ही लहान मुलेही शाळेत गेली. घरात फक्त विद्यार्थिनी एकटीच होती. यादरम्यान आरोपीने घरात घुसून आपल्या मुलीसोबत हा गुन्हा केला. त्यांनी सांगितले की, त्यांची धाकटी मुलगी दुपारी एकच्या सुमारास शाळेतून परतली तेव्हा तिला अंगणात तिची बहीण मृतावस्थेत दिसली. हेही वाचा Pune Crime: किळसवाणे कृत्य ! प्रियकर सोबत रहावा म्हणून आईनेच 15 वर्षीय मुलीचे तरुणाशी लावले लग्न, दोघांना अटक
पीडितेच्या आईने सांगितले की, तिच्या मुलीच्या अंगावर कोणतेही कपडे नव्हते. खूप रक्त सांडलं होतं. रक्ताने माखलेले लाकूडही जवळच ठेवले होते. हा सर्व प्रकार पाहून त्यांची मुलगी रडायला लागली आणि त्यांना हाक मारली. तिने तातडीने घरी पोहोचून पतीला माहिती दिली. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी सांगितले की, घटनास्थळ पाहिल्यानंतर आरोपीने आपल्या मुलीवर किती क्रूर कृत्य केले असेल हे समजले.
प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन करून घेतले. ज्यामध्ये पुरुष आणि महिला डॉक्टरांच्या टीमने कॅमेऱ्यासमोर शवविच्छेदन करून अहवाल दिला आहे. या अहवालात मृत्यूचे कारण प्रायव्हेट पार्टमधून जास्त रक्तस्राव असल्याचे सांगण्यात आले आहे. यासोबतच विद्यार्थिनीवर झालेल्या पाशवी बलात्काराचीही पुष्टी झाली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बलात्कारानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काही कठीण वस्तू टाकण्यात आली होती. ती लाकडी किंवा लोखंडी काठी असू शकते.