देशातील वाढती लोकसंख्या पाहता ती नियंत्रणात आणण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी लोकसंख्या नियमन विधेयक (Population Regulation Bill 2019) संसदेत मांडले जाणार आहे. भाजप खासदार राकेश सिन्हा (Rakesh Sinha) हे विधेयक संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या लोकसभेत मांडतील. हे विधेयक खासगी (Private Member's Bill) स्वरुपाचे असेल.
लोकसभेच्या कामकाजाच्या आजच्या सूचीत याचा उल्लेख असणार आहे. विधेयकाचे नाव 'द पॉपुलेशन रेग्यूलेशन बिल 2019' असे आहे. लोकसभेच्या कामकाजाच्या सूची क्रमंक 21 वर रागेश सिन्हा यांच्या नावावर खासगी सदस्य विधेयक असे म्हटले आहे. लोकसभा खासदार रवि किशन (Ravi Kishan), सुशील कुमार सिंह (Sushil Kumar Singh), विष्णु दयाल राम (Vishnu Dayal Ram) आणि डॉ. आलोक कुमार सुमन यांनी हे विधेयक मांडणार असल्याचे म्हटले आहे.
लोकसभेच्या कार्यकारी सूचीत म्हटले आहे की, एक कुटुंब दोन मुले म्हणजेच छोटे कुटुंब सुखी कुटंब या उद्देशाने हे विधेयक मांडण्यात येणार आहे. या बिलाबाबत सांगण्यात आले आहे की, छोटे कुटुंब असेल तर देशात मुलांचे पालन पोषण करणे पालकांना शक्य होईल. संतुलीत आहार आणि त्याच्या भविष्याच्या दृष्टीने विचार करता येईल. दोन मुलांच्या मध्ये योग्य आंतर राहील. महिलांनाही बाळंतपणानंतर योग्य ती आरोग्यदाई सेवा पुरवता येईल, असे म्हटले आहे.
राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रजनन स्वास्थ्य सेवा प्रत्येक व्यक्तीसाठी उपलब्ध करण्यासाठी, त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्यांच्या आवश्कतेनुसार देण्याबबत लोकसंख्या नियमन विधेयकात जोर देण्यात आला आहे. याशिवाय सामाजिक, आर्थिक, आरोग्य, पोषण,महामारी, विज्ञान, पर्यावरण आणि इतर विकासात्मक आश्यकतेसोबत लोकसंख्या नियंत्रणाचे लक्ष गाठण्यासाठी हे विधेयक सादर करण्याबाबत सांगण्यात आले आहे.