Asaduddin Owaisi | X

हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी आज संसदेमध्ये शपथ घेताना 'जय भीम, जय तेलंगणा, जय एमआयएम, जय पॅलेस्टाईन, अला हू अकबर' म्हटल्याने भाजपा खासदारांनी आक्षेप घेतला. दरम्यान उर्दु मधुन शपथ घेतल्यानंतर शेवटच्या घोषणांमुळे काही खासदारांनी संसदेत आक्षेप नोंदवला. मात्र त्यांच्या घोषणांना रेकॉर्ड वर घेतलं नसल्याचं म्हटलं आहे. ओवेसी यांनी  हैदराबाद मध्ये भाजपा च्या माधवी लता यांचा 3.38 लाख मतांनी पराभव केला आहे. ते पाचव्यांदा खासदार झाले आहेत.

ओवेसी यांनी 'जय पॅलेस्टाईन' वरून केलेल्या घोषणेवर स्वतःचा बचाव करताना 'मी दिलेल्या घोषणेमध्ये चूक काय? असा सवाल त्यांनी विचारला आहे. संविधानाचा कोणता नियम मी मोडला आहे? असा सवालही त्यांनी विचारला आहे. महात्मा गांधींचे पॅलेस्टाईन बद्दलचे मत जाणून घ्या असे ओवेसी म्हणाले आहेत.

ओवेसी यांच्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं की, आम्ही कोणत्याही देशाचे समर्थन किंवा विरोध करत नाही, मात्र सभागृहात कोणत्याही देशाचे नाव घेणे योग्य नाही.