दिवाळी निमित्त Motorola ने लाँच केला 75 इंचाचा नवा स्मार्ट टीव्ही; जाणून घ्या Price आणि Features
Motorola New TV (Photo Credits: Facebook)

दिवाळीनिमित्त ‘मोटोरोला’ने भारतात खास एक नवा 4K UHD स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. या आधी मोटोरोला कंपनीकडे 32 इंच ते 65 इंचापर्यंतचेच टीव्ही उपलब्ध होते. पण या नव्या स्मार्ट टीव्हीचं वैशिष्ट्य म्हणजे याला 75 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे व डॉल्बी व्हिजन आणि HDR 10 चा सपोर्टही देण्यात आला आहे.

अँड्रॉइडच्या पाय या लेटेस्ट व्हर्जनवर चालणाऱ्या या टीव्हीमध्ये गुगल असिस्टंट हे ऍप इनबिल्ट आहे. त्यामुळे युजर व्हॉईस कमांडद्वारे काहीही सहज सर्च करू शकतो. तसेच या टीव्हीमहदये 30W बॉटम फायरिंग स्पीकर्स आहेत आणि दर्जेदार साउंड आउटपुटसाठी DTS सराउंड साउंड टेक्नॉलजी आणि डॉल्बी ऑडिओ सपोर्टचा देखील वापर करण्यात आला आहे.

आता पाहूया या नव्या टीव्हीची किंमत

हा टीव्ही तुम्हला ऑनलाइन तसेच ऑफलाइन या दोन्ही प्रकारे खरेदी करता येईल. फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर हा टीव्ही 1,19,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे आणि मुख्य म्हणजे फ्लिपकार्टवर या टीव्हीची खरेदी SBI बँकेच्या कार्डद्वारे केली तर 10 टक्के सवलत आणि ऍक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना 5 टक्के डिस्काउंट मिळणार आहे.

ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह Moto G8 Plus लॉन्च, जाणून घ्या फिचर्स 

काही खास फीचर्स

वेब कन्टेन्ट पाहणाऱ्यांची या टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स आणि ऍमेझॉन प्राइम व्हिडिओ यांसारखे एंटरटेनमेंट फीचर्स देण्यात आलेत आहेत. तसेच क्वॉडकोर CA53 प्रोसेसर असलेल्या या टीव्हीमध्ये 16 जीबीचे इनबिल्ट स्टोअरेज देखील उपलब्ध आहे.