Photo Credit- X

Most Runs & Wickets in Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले आहेत. ज्यामध्ये पाकिस्तान गतविजेता म्हणून खेळत आहे. स्पर्धेच्या नवव्या आवृत्तीत, फक्त भारताचे सामने दुबईमध्ये खेळवले जात आहेत. आयसीसी, बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यातील हायब्रिड मॉडेल करारांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेतील आठ संघांना गट अ आणि गट ब अशा दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे, ज्यामधून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ५ फलंदाज आणि गोलंदाजांची यादी खाली पहा.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सर्वाधिक धावा:

वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ख्रिस गेल चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 17 सामन्यांमध्ये एकूण 791 धावा केल्या आहेत. श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू महेला 742 धावांसह यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज शिखर धवन आहे. ज्याच्या नावावर 701 धावा आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली हा एकमेव सक्रिय क्रिकेटपटू आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सर्वाधिक विकेट्स:

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात न्यूझीलंडचा काइल मिल्स सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने 15 सामन्यांमध्ये एकूण 28 विकेट्स घेतल्या आहेत. श्रीलंकेचे दिग्गज खेळाडू लसिथ मलिंगा आणि मुथय्या मुरलीधरन अनुक्रमे 25 आणि 24 विकेट्ससह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. रवींद्र जडेजा हा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. आतापर्यंत त्याने 12 सामन्यांमध्ये एकूण 17 विकेट्स घेतल्या आहेत.