पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे देशातील सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय राजकारणी (Most Popular Politician) ठरले आहेत. चेकब्रँड (Checkbrand) अहवालात ही माहिती समोर आली आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान गुगल, ट्विटर आणि यूट्यूब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्वाधिक ट्रेंड हे मोदींशी संबंधित होते. अशा प्रकारे पंतप्रधान मोदी सोशल मीडिया प्लॅटफार्मवर सर्वाधिक आघाडीचे नेता आहेत. पंतप्रधानांना 2,171 ट्रेंड मिळाले आहेत. दुसर्या क्रमांकावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (YS Jaganmohan Reddy) आहेत, त्यांनी 2,137 ट्रेंड मिळवले. ऑनलाईन सेन्टिमेंट एनालिसिस कंपनी चेकब्रँडने सोशल मीडियावर यावर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यानच्या अव्वल 95 राजकीय नेत्यांचे तसेच 500 प्रभावशाली नेत्यांचे ऑनलाइन विश्लेषण केले आहे.
यामध्ये असेही म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी आणि जगनमोहन रेड्डी यांच्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशीही अनेक महत्त्वपूर्ण ट्रेंड संबंधित होते. या अहवालानुसार, मोदींकडे एकत्रितपणे 70 ब्रँड स्कोअर होता, जे जवळच्या राजकीय नेत्याच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. ब्रँड स्कोअर पाच निकषांवर आधारित आहे- फॉलोअर्स (20), ट्रेंड (10), सेंटीमेंट (30), एंगेजमेंट (20) आणि मेन्सन्स (20). गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे 36.43, आसामचे दिवंगत मुख्यमंत्री तरुण गोगई यांचा 31.89, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू यांचा 31.89, आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा 27.03 इतका होता. (हेही वाचा: भारत सरकारने MangoTV, Alipay Cashier, DingTalk, AliExpress यांच्यासह 43 चायनीज अॅप्सवर घातली बंदी; पहा संपूर्ण यादी)
यासह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव सोशल मीडियावर गेल्या तीन महिन्यांत 40,000 वेळा नमूद करण्यात आले आहे. पंतप्रधान, सोशल मीडियावर देशातील सर्वात लोकप्रिय नेते होण्याव्यतिरिक्त, पंतप्रधान मोदींची ब्रँड व्हॅल्यू देखील चांगली आहे. अभ्यासानुसार पीएम मोदी यांची ब्रँड व्हॅल्यू सुमारे 336 कोटी रुपये आहे, तर गृहमंत्री अमित शहा यांची ब्रँड व्हॅल्यू 335 कोटी रुपये आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ब्रँड व्हॅल्यू 328 कोटी आहे.