Dead| Photo Credit - Pixabay

दिल्लीच्या शास्त्री पार्क परिसरातील एका कुटुंबातील सहा सदस्यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. डासांना मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॉइलमधून निघालेल्या विषारी वायूमुळे या लोकांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला होता. रात्री कुटुंबाच्या घरातील गादीवर जळणारी डासांची कॉइल पडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. विषारी धुरामुळे पीडित कुटुंब आधी बेशुद्ध झाले आणि नंतर गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.  या घटनेत एक महिला आणि दीड वर्षाच्या मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला.  दरम्यान, 15 वर्षीय मुलीसह इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर भाजल्याने उपचार सुरू आहेत. 22 वर्षे वयाच्या आणखी एका व्यक्तीला प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

पोलिसांनी आपल्या प्राथमिक तपासानंतर सांगि्तले की, मच्छरांना मारणारी कॉईल रात्री गादीवर पडली ज्यामुळे पुर्ण रुममध्ये विषारी वायू पसरला. यानंततर गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला. सध्या या घटनेची पोलीस चौकशी करत असून अग्निशमन दलाने घरात लागलेली आग विझवली आहे.

पोलिसांनी सांगितले की, मरणाऱ्यांमध्ये 6 लोकांचा समावेश असून 4 पुरुष 1 महिला आणि एक दिड वर्षाच्या लहान मुलाचा समावेश आहे. आगीत एका 15 वर्षीय मुलगी आणि 45 वर्षाच्या व्यक्तीला गंभीर जखमा झाल्या आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार हे सुरु आहे.