यंदा जूनच्या संपूर्ण महिन्यात दडी मारून बसलेला पाऊस जुलै महिन्यात भरून काढत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर आणखीनच वाढला असून याचा सर्वात मोठा प्रभाव हा महाराष्ट्रात (Maharashtra) पाहायला मिळत आहे. स्कायमेट वेदर या संस्थेने रविवारी 4 ऑगस्ट रोजी देशभरात नोंदवलेल्या पावसाची एक सरासरी आकडेवारी प्रसिद्ध केली. या यादीत महाराष्ट्रातील सात, गुजरात (Gujraat) मधील दोन आणि तेलंगणा (Telangana) मधील एक ठिकाण समाविष्ट आहे.
स्कायमेटच्या माहितीनुसार, महाराष्ट्र व गुजरात मध्ये मागील २४ तासात पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. या मध्ये माथेरान हे 440 MM पावसासह या यादीत पाहिल्या स्थानावर आहे.न यापाठोपाठ अलिबाग मध्ये आजवरचा सर्वाधिक म्हणजेच 411 MM पाऊस झाला आहे. या व्यतिरिक्त ठाणे, महाबळेश्वर, रत्नागिरी, नाशिक, वेंगुर्ला या भागात पावसाचे सर्वाधिक नोंद करण्यात आली आहे. तर गुजरात मध्ये वलसाड आणि वडोदरा या ठिकाणी पावसाचा जोर अधिक पाहायला मिळत आहे. याशिवाय तेलंगणा मधील आदिलाबाद हे ठिकाण 72 MM पावसासह या यादीत सर्वात खालच्या स्थानी आहे.
पहा सर्वाधिक पाऊस असलेल्या ठिकाणांची आकडेवारी
ठिकाण राज्य पावसाची सरासरी
माथेरान महाराष्ट्र 440 MM
अलिबाग महाराष्ट्र 411 MM
ठाणे महाराष्ट्र 342 MM
महाबळेश्वर महाराष्ट्र 306 MM
वलसाड गुजरात 178 MM
रत्नागिरी महाराष्ट्र 154 MM
वडोदरा गुजरात 119 MM
नाशिक महाराष्ट्र 99 MM
वेंगुर्ला महाराष्ट्र 93 MM
आदिलाबाद तेलंगणा 72 MM
दरम्यान, पश्चिम किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज, 4 ऑगस्ट मध्यरात्री उशिरापर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत पावसाचं जोर कायम राहणार हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला आहे.