ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी मोहन मांझी यांची निवड करण्यात आली आहे. मोहन मांझी हे बुधवारी मु्ख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. केवी सिंह देव आणि प्रवती परिदा हे दोघेजण उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.  केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी मोहन मांझी यांच्या नावाची घोषणा केली आहे.  52 वर्षीय नेते, चार वेळा आमदार असून एक प्रमुख आदिवासी चेहरा आहेत. त्यांच्याकडे दोन डेप्युटी सीएम असतील- कनक वर्धन सिंग देव आणि प्रवती परिदा सिंग यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी असणार आहे. (हेही वाचा - Chirag Paswan: चिराग पासवान यांनी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला, म्हणाले जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन (Watch Video))

पाहा व्हिडिओ -

ओडिशामध्ये भाजपने पहिल्यांदाच सत्ता प्राप्त केली असून मोहन चरण माझी ओडिशाचे 15 वे मुख्यमंत्री म्हणून बुधवारी शपथ घेतील. 2019 च्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत ते केओंधार विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले. 2000 ते 2009 दरम्यान त्यांनी दोनदा केओंझारचे प्रतिनिधित्व केले. केवळ उडिया भाषा बोलणारी व्यक्तीच राज्याचा मुख्यमंत्री होईल असं वचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान दिलं होतं. त्यानंतर आता मोहन मांझी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.