Mob Attack in MP at Neemuch | (Photo Credit: Twitter)

मध्यप्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील नीमच (Neemuch) येथे मानवतेला काळीमा फासली जावी अशी घटना घडली आहे. केवळ चोरीच्या संशयातून एका तरुणाला नागरिकांनी बेदम मारहाण केली, त्याला झाडाला बांधले इतकेच नव्हे तर त्याच्या पायाला दोरी बांधून त्या दोरीचे दुसरे टोक ट्रकला बांधून त्याला रस्त्यावर फरफटत नेले. पीडित तरुणाने अत्यंत वेदनेने आपले प्राण सोडले. त्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियात पीडित तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कान्हा उर्फ कन्हैय्या भील (Kanha alias Kanhaiya Bhil) असे मृत तरुणाचे नाव आहे. 45 वर्षांचा हा युवक बाणदा येथील नागरिक आहे.

प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी महेंद्र गुर्जर हा प्रमुख आरोपी आहे. त्याची पत्नी बाणदा येथील सरपंच आहे. आरोपींनी युवकासोबत केलेल्या क्रूर कृत्याचा व्हिडिओही बनवला आहे. जो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. (हेही वाचा, Karnal SDM Viral Video: शेतकऱ्यांची डोकी फोडा, हरियाणातील एसडीएम आयुष सिन्हा यांचा व्हिडिओ व्हायरल)

ट्विट

प्राप्त माहितीनुसार, संबंधित घटनेत पोलिसांनी 8 आरोपींची ओळख पटवली आहे. त्यापैकी 4 जणांना अटक झाली आहे. तरुणाला बेदम मारहाण करणाऱ्या तरुणांवर हत्या आणि अॅट्रेसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मध्य प्रदेश राज्यातील नीचम जिल्ह्यातील सिंगोली यथे घडली. एका भिल्ल आदिवासीला चोर असल्याच्या संशयावरुन काही तरुणांनी अत्यंत वाईट पद्धतीने मारहाण केली. तसे, एका पिकअप वाहनाला या तरुणास रस्सीने बांधून फरफटतही नेले.

ट्विट

दरम्यान, बेदम मारहाण केल्यानंतर संबंधीत समूहाने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पीडित तरुणाला ताब्यात घेऊन नीमच येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.