Karnal SDM Viral Video: शेतकऱ्यांची डोकी फोडा, हरियाणातील एसडीएम आयुष सिन्हा यांचा व्हिडिओ व्हायरल
Karnal SDM Viral Video | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

हरियाणा (Haryana) राज्यातील करनाल (Karnal) येथे भाजपा (BJP) बैठकीपूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत हरियाणातील उपविभागीय दंडाधिकारी (Sub Divisional Magistrate) आयुष सिन्हा (Ayush Sinha) ​पोलिसांना शेतकऱ्यांविरुद्ध कसे लढायचे आहे याचे मार्गदर्शन करताना दिसत आहे. या व्हिडिओत दिसते आहे की, शेतकऱ्यांवरल लाठीचार्ज करा. त्यांची डोकी फोडा. दरमयान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच व्हिडिओबाबत संमिश्र प्रतिक्रिया पुढे येत आहेत. काही लोकांनी या व्हिडिओनंतर सरकारवर टीका केली आहे.

भाजपच्या एका बैठकीला विरोध करण्यासाठी करनालच्या दिशेने जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या एका समूहावर राज्य पोलिसांकडून लाठीमार केला गेला. या लाठीचार्जमध्ये जवळपास 10 लोक घायाळ झाले. भाजपच्या बैठकीला मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, राज्य भाजपा प्रमुख ओम प्रकाश धनखड आणि इतरही वरिष्ठ नेते उपस्थित होते.

व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, करनालचे एसडीएम आयुष सिन्हा हे पोलिस कर्मींच्या एका समूहाला मार्गदर्शन करताना दिसतात. ते सांगतात की कोणताही शेतकरी निश्चित केलेल्या सीमेच्या (बॅरिकेट्स) पुढे येता कामा नये. हे स्पष्ट आहे की, कोणत्याही स्थितीमध्ये शेतकऱ्यांना आपण निश्चित सीमेच्या पुढे येऊ द्यायचे नाही. जर तसा कोणी प्रयत्न केला तर आपली काठी उचला आणि जोरात मारा. कोणाला कोणत्याही आदेशाची आवश्यकता नाही. फक्त त्यांना जोरदार फटके द्या. जर मला इथे कोणता आंदोलक शेतकरी पाहायला मिळाला तर मला त्याचे डोकेही फुटलेले दिसले पाहिजे. या नंततर एसडीएम विचारतात की कोणाला काही शंका? पोलीस मोठ्या आवाजात सामूहिक रित्या सांगतात की 'नाही सर'. (हेही वाचा, Fact Check: पीएम लाडली लक्ष्मी योजनेंतर्गत केंद्र सरकार मुलींना देत आहे 1 लाख 60 हजार रुपये? जाणून घ्या या व्हायरल मेसेजमागील सत्य)

ट्विट

दरम्यान, करनाल येथे पोलीसांच्या कारवाईबाबत माहिती पुढे येताच इतर जिल्ह्यांतील शेतकरीही मोठ्या संख्येने बाहेर पडले. त्यांनी एकत्र येत राज्य मार्ग अडवला. त्यामुळे दिल्ली आणि चंदिगढ अशा शहरांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. पोलिसांकडून सांगण्यात आले आहे की, शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारे मोठ्या प्रमाणावर लाठीमार करण्यात आला नाही. सौम्य प्रमाणात लाठीमार झाला, असेही पोलीस म्हणाले.