एकीकडे देशात कोरोना विषाणू (Coronavirus) साथीची भीती आहे आणि दुसरीकडे राजकारण्यांची विधाने लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करीत आहेत. कोरोनाकाळात अनेक राजकारण्यांनी या महामारीसंदर्भात विचित्र विधाने करून प्रसिद्धी मिळवली. कोणी गोमुत्राने अंघोळ करण्यास सांगितले तर कोणी धूप जाळण्यास सांगितले. आता राजस्थानचे जल आणि ऊर्जामंत्री बीडी कल्ला (B.D. Kalla) यांचे नाव या यादीमध्ये समाविष्ट झाले आहे. कल्ला यांनी कोरोना विषाणूविरूद्ध केंद्राच्या सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. कल्ला म्हणाले की, वृद्धांपेक्षा मुलांना लसीची जास्त गरज असते. मंत्री यावर न थांबता पुढे म्हणाले की, वृद्ध तर बोनसमध्ये जगत आहेत.
राजस्थानच्या हनुमानगडमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. कल्ला यांच्या वक्तव्यावरून त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या गहलोत सरकारवर निशाणा साधला आहे. लसीकरण धोरणावर प्रश्न उभा करत कल्ला म्हणाले, ‘आपल्याला माहित आहे लस कोणाला दिली जाते? आजपर्यंत आपल्या देशात फक्त मुलांनाच विविध लसी दिल्या गेल्या आहेत. ज्येष्ठांना कुठे लसी दिल्या जातात? लस प्रथम मुलांना दिली जाते. मुलांसमोर त्यांची आयुष्ये पडली आहेत.’
श्रीमान बीडी कल्ला जी के टीकाकरण की नीति पर नये विचार सुनिये!
वैक्सीन की खरीद से लेकर बर्बादी तक, लोगो के जीवन के साथ खिलवाड़ करने वाली हर तरह की राजनीति करने के बाद अब इनका अगला कदम बच्चे, बूढ़े और जवान में किसको लगनी चाहिए और किसको नहीं पर टिक गया है।
/1#Rajasthan pic.twitter.com/ue1M6fopt7
— Gajendra Singh Shekhawat (@gssjodhpur) June 11, 2021
ते पुढे म्हणाले, ‘मात्र इथे प्रथम वृद्ध लोकांना लस दिली. वृद्ध लोक म्हणत आहेत– मी 80-85 वर्षे जगलो, माझे आयुष्य पूर्ण झाले आहे त्यामुळे माझ्या नातवाला आधी लस द्या, माझ्या मुला-मुलींना द्या. त्यांचे आयुष्य वाचणे जास्त महत्वाचे आहे. मी मरण पावलो तरी काही हरकत नाही, किमान माझ्या भावी पिढीला तरी वाचवा. मात्र इथे लसीकरण धोरण खूप चुकीचे आहे, मुलांना पहिल्यांदा लस दिली पाहिजे होती.’ मोदी सरकारचे धोरण चुकीचे असून त्यामुळेच समस्या निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
(हेही वाचा: धक्कादायक, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने घेतला 719 डॉक्टरांचा नाहक बळी, पाहा भारतातील राज्यनिहाय आकडेवारी)
कल्ला यांच्या विधानावरून भाजपने कॉंग्रेसवर हल्ला केला आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी ट्विट केले आहे की, ‘श्री. बीडी कल्ला यांची लसीकरण धोरणाबद्दल नवीन मते ऐका! लोकांच्या जीवाशी खेळणारे राजकारण केल्यानंतर आता त्यांनी, मुले, म्हातारे, तरूण यांपैकी कोणाला लस मिळायला हवी याबाबत मत व्यक्त केले आहे.’ ते पुढे म्हणतात, ‘मान्य आहे की, कॉंग्रेसचे मानसिक आणि राजकीय संतुलन बिघडलेले आहे, परंतु ते इतके मोठ्या प्रमाणावर? सर्वांनाच कॉंग्रेसचे लस राजकारण माहित आहे. पण ते असे हास्यास्पद असेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती.’