प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- ट्विटर)

पुन्हा एकदा दूधाचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागणार आहे. तर डेअरी उद्योगधंद्यासाठी मुखत्वे जनांवरांवर अवलंबून राहावे लागत. त्यात जनावरांचे चाऱ्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. या कारणामुळे गायी आणि म्हशींच्या खाद्याचा खर्च दुप्पीटीने वाढला आहे.

गेल्या महिन्यात अमूल कंपनीने दुधाचा दरात 2 रुपयांनी वाढ केली आहे. त्यानुसार आता अन्य दुध कंपन्यांसुद्धा त्यांच्या दरात वाढ करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मदर डेअरी यांनी असे म्हटले आहे की. राज्यात पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांकडून कंपन्यांना पुरवण्यात येणाऱ्या दूधाच्या किंमती वाढवल्या आहेत.

(पतंजली कंपनीचे दूध विक्री क्षेत्रात पदार्पण, अमुल व मदर डेरीच्या तुलनेत आकारणार कमीत कमी दर)

तसेच यंदा जास्तकाळ उन्हाळाचे वातावरण झाल्याने पावसाच्या अभावी चाऱ्याचा पुरवठा कमी झाला आहे. यामुळे दूधाचे उत्पादन कमी झाले असून कच्च्या दूधाचे भाव वाढवण्यात आले आहेत.