Military Chopper Crash in Tamil Nadu (Photo Credits-ANI)

भारतीय लष्कराचे चिफ डिफेन्स ऑफ स्टाफ जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांचे हेलिकॉप्टर अपघातात आकस्मिक निधन झाले. तामिळनाडू (Tamil Nadu) राज्यातील येथील कुन्नूर येथे बिपीन रावत यांना घेऊन प्रवास करणारे भारतीय हवाई दलाचे Mi-17V5 हे हेलिकॉप्टर क्रॅश (Chopper Crash) झाले. या दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांच्यास त्यांच्या पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) आणि 13 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राहुल गांधी आणि देशभरातील विविध मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे की, 'जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका जी यांच्या अकाली निधनाने मला धक्का बसला आहे. देशाने आपला एक शूर पुत्र गमावला आहे. मातृभूमीसाठी त्यांची चार दशके नि:स्वार्थ सेवा अपवादात्मक शौर्य आणि पराक्रमाने चिन्हांकित होती. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना. तामिळनाडू येथील हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल जाणून घेणे माझ्यासाठी खूप वेदनादायक आहे. कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येकाला मी श्रद्धांजली अर्पण करत आहे. सर्वांच्या शोकाकुल कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना. (हेही वाचा, Military Chopper Crash: तामिळनाडूमध्ये भारतीय हवाई दलाचे Mi-17V5 हेलिकॉप्टर क्रॅश; लष्कर प्रमुख Bipin Rawat यांच्यासह 13 जणांचा मृत्यू)

ट्विट

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे मी अत्यंत दु:खी आहे. या दुर्घटनेत आम्ही सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि सशस्त्र दलातील इतर कर्मचारी गमावले आहेत. त्यांनी अत्यंत तन्मयतेने भारताची सेवा केली. माझी सद्भावना त्यांच्या कुटुंबीयांप्रती आहे.

अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहेकी, आजचा दिवस देशासाठी अतिशय दु:खद आहे कारण आम्ही आमचे CDS, जनरल बिपिन रावत यांना एका अत्यंत दुःखद अपघातात गमावले आहे. ते शूर सैनिकांपैकी एक होते, ज्यांनी अत्यंत निष्ठेने मातृभूमीची सेवा केली. त्यांचे अनुकरणीय योगदान आणि वचनबद्धता शब्दात मांडता येणार नाही. मला खूप वेदना होत आहेत. मी श्रीमती मधुलिका रावत आणि इतर 11 सशस्त्र दलाच्या कर्मचार्‍यांच्या दु:खद निधनाबद्दल माझ्या मनापासून शोक व्यक्त करतो. माझ्या भावना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.

राहुल गांधी, काँग्रेस नेते

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, मी जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीच्या कुटुंबीयांच्या प्रति संवेदना व्यक्त करतो. ही एक अभूतपूर्व शोकांतिका आहे आणि या कठीण काळात आमच्या भावना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. बिपीन रावत आणि मधुलीका रावत यांच्यासोबत या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या इतर सर्वांना श्रद्धांजली. या दुःखात भारत एकजुटीने उभा आहे.