
Kanpur Fire: कानपूर (Kanpur) मधील चमनगंज पोलीस स्टेशन परिसरातील एका पाच मजली इमारतीला भीषण आग (Kanpur Fire) लागली आहे. या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण इमारत वेढली होती. या आगीत इमारतीत राहणाऱ्या पती, पत्नी आणि तीन मुलींचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या 50 हून अधिक गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
कानपूरमधील चमनगंज पोलिस स्टेशन हद्दीतील गांधीनगर परिसरात एका पाच मजली इमारतीला भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की तिने संपूर्ण इमारतीला वेढले. आगीमुळे इमारतीत अनेक लोक अडकले होते. घाईघाईत अग्निशमन दलाच्या सर्व गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. आग इतकी भीषण होती की आजूबाजूच्या इमारतीही रिकामी करण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, पाच मजली इमारतीत बेकायदेशीर चप्पल कारखाना सुरू होता. तथापि, ही आग कशामुळे लागली हे कळू शकले नाही. (हेही वाचा - Mumbai Fire: दक्षिण मुंबई मध्ये जसलोक हॉस्पिटल जवळ Riyaz Gangji Libas boutique या डिझायनर बुटिकला आग (Watch Video))
कानपूरमधील पाच मजली इमारतीला आग -
यूपी के कानपुर में 5 पांच मंजिला बिल्डिंग में लगी भीषण आग,
एक ही परिवार के पांच लोगों की जिंदा जलकर दर्दनात मौत
बिल्डिंग के चौथे फ्लोर में आग लगने के समय फंस गया था परिवार
चमनगंज के गांधीनगर इलाके का मामला#Kanpur #Uttarpradesh #Fire #FireAccident pic.twitter.com/JK6TWdN1Wy
— Ravi Pandey🇮🇳 (@ravipandey2643) May 5, 2025
या घटनेवर एडीसीपी सेंट्रल कानपूर राजेश श्रीवास्तव यांनीही निवेदन जारी केले होते. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, 'पाच जणांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे, त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्याच्या जगण्याची आशा खूपच कमी आहे.' यानंतर आज सकाळी 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
दरम्यान, कानपूर शहरातील चमनगंज परिसरात आग लागलेल्या इमारतीत बराच वेळ बचावकार्य सुरू होते. एसडीआरएफ आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. याशिवाय, लोकांची मोठी गर्दी घटनास्थळी जमा झाली होती.